शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

टीम इंडियाच्या विजयाचा उपराजधानीत जल्लोष : फटाके फोडून झाले सेलिब्रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 12:08 AM

‘किंग कोहली’ची धडाडलेली ‘रनमशीन’, माहीचे ‘ऑलवेज कूल’ व्यवस्थापन, जसप्रीतने दिलेली ‘टशन’, कुलदीप यादवच्या फिरकीची ‘जादू’... कांगारूंच्या विरोधात ‘टीम इंडिया’चा ‘परफॉर्मन्स’ प्रत्यक्ष ‘याचि देही, याचि डोळा’ पाहण्याची मिळालेली संधी अन् अखेरच्या षटकापर्यंत चाललेल्या चुरशीच्या सामन्यातील दिमाखदार विजय. नागपूरकर क्रिकेटप्रेमींसाठी तर मंगळवार हा ‘फुल्ल ऑन’ ‘क्रिकेट डे’च ठरला. कोहलीचे शतक अन् विजयाचा धमाका यांचा योग आल्याने तर क्या कहने! भारताचा विजय झाला अन् संत्रानगरीने आपल्या ‘स्टाईल’ने ‘सेलिब्रेशन’ला सुरुवात केली.

ठळक मुद्दे‘किंग कोहली’च्या कारनाम्याने क्रिकेटप्रेमी ‘क्रेझी’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘किंग कोहली’ची धडाडलेली ‘रनमशीन’, माहीचे ‘ऑलवेज कूल’ व्यवस्थापन, जसप्रीतने दिलेली ‘टशन’, कुलदीप यादवच्या फिरकीची ‘जादू’... कांगारूंच्या विरोधात ‘टीम इंडिया’चा ‘परफॉर्मन्स’ प्रत्यक्ष ‘याचि देही, याचि डोळा’ पाहण्याची मिळालेली संधी अन् अखेरच्या षटकापर्यंत चाललेल्या चुरशीच्या सामन्यातील दिमाखदार विजय. नागपूरकर क्रिकेटप्रेमींसाठी तर मंगळवार हा ‘फुल्ल ऑन’ ‘क्रिकेट डे’च ठरला. कोहलीचे शतक अन् विजयाचा धमाका यांचा योग आल्याने तर क्या कहने! भारताचा विजय झाला अन् संत्रानगरीने आपल्या ‘स्टाईल’ने ‘सेलिब्रेशन’ला सुरुवात केली.नागपुरात क्रिकेट सामना होणार असल्याने क्रिकेटप्रेमींसोबतच सर्वसामान्य नागरिकांमध्येदेखील प्रचंड उत्सुकता होती. येता-जाता प्रत्येक जण ‘भाई स्कोअर क्या हुआ’ अशीच विचारणा करीत होता. अनेक जण तनाने कार्यालयांत होते, मात्र मनाने दिवसभर ‘जामठा’ येथेच होते. जे प्रत्यक्ष मैदानावर जाऊ शकले नाही त्यांच्यापैकी अनेक जण सायंकाळनंतर विविध ठिकाणी एकत्रित आले व क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या सामन्याचा आनंद लुटला. अखेरच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विजय शंकरने ‘ऑसी’ अ‍ॅडम झाम्पाचा त्रिफळा उडविला अन् शहरात एकच जल्लोषाला सुरुवात झाली. धरमपेठ, सदर, सीताबर्डी, रेशीमबाग, वर्धमाननगर, प्रतापनगर, फुटाळा इत्यादी ठिकाणी फटाके फोडून विजयाचे स्वागत करण्यात आले. याशिवाय तरुणाईच्या कट्ट्यांवरदेखील जोरदार ‘सेलिब्रेशन’ झाल्याचे दिसून आले.नागपूर झाले ‘क्रिकेटमय’विश्वचषकाच्या उंबरठ्यावर होत असलेल्या भारत-ऑस्ट्रेलियाच्या सामन्याबद्दल नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मंगळवारी कामाचा दिवस असला तरी अनेक जणांनी सुटी टाकून थेट ‘जामठा’ गाठले. यात महाविद्यालयीन तरुण, तरुणींचादेखील मोठ्या प्रमाणावर समावेश होता. सामन्याच्या दोन तासअगोदरपासूनच वर्धा मार्गाकडे जाणाऱ्या मार्गांवर ‘ब्ल्यू फिल’ दिसून येत होता. विविध पद्धतीने खेळाडूंना ‘चिअर अप’ करण्यासाठी चाहते ‘पोस्टर्स’, विग्ज, कॅप्स इत्यादी घेऊन मैदानाजवळ पोहोचले. ‘सोशल मीडिया’ वरदेखील नागपूरकर तरुणाई ‘क्रिकेटमय’ झाली होती.

 

 

 

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीCelebrityसेलिब्रिटी