प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:48 IST2021-02-05T04:48:38+5:302021-02-05T04:48:38+5:30

हातमाग महामंडळ () महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे उमरेड राेडवरील मुख्यालय परिसरात प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात आला. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका ...

Celebrate Republic Day with enthusiasm | प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

हातमाग महामंडळ ()

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे उमरेड राेडवरील मुख्यालय परिसरात प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात आला. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका तथा वस्त्राेद्याेग आयुक्त डाॅ. माधवी खाेडे यांच्या हस्ते ध्वजाराेहण करून सलामी देण्यात आली. याप्रसंगी महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक व्ही.डी. निमजे तसेच हातमाग महामंडळ व रेशीम संचालनालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते.

पाॅवरग्रीड काॅर्पाेरेशन इंडिया लिमिटेड ()

पाॅवरग्रीड काॅर्पाेरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या पश्चिम क्षेत्र-१ मुख्यालयात भारताचा ७२ वा प्रजासत्ताकदिन माेठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रिजन-१ चे कार्यकारी संचालक एस. रविंदर कुमार यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. त्यांनी मार्गदर्शन करताना, काेराेनासारख्या कठीण काळातही ट्रान्समिशन सिस्टीम, कन्स्ट्रक्शन, ऑपरेशन व मेंटेनन्स तसेच इतर विभागात याेगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्य महाव्यवस्थापक ए. नागराजू, सीजीएम के. पी. बालनारायण तसेच सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते.

न्यू कैलासनगर येथे ध्वजाराेहण

भारताच्या ७२ व्या गणतंत्र दिनानिमित्त न्यू कैलासनगर येथे ध्वजाराेहण करण्यात आले. माजी आमदार सुधाकर काेहळे यांच्या हस्ते ध्वजाराेहण करून मानवंदना देण्यात आली आणि संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी नगरसेविका वंदना भगत, मधुकर पाठक, प्राचार्या मंगला ढाबरे, उमेश उमरे, देवेंद्र ठेपे प्रामुख्याने उपस्थित हाेते. आयाेजनात राजेश वासनिक, प्रवीण साळवे, वामन नाईक, गणेश भलावी, शाेभा कांबळे, सायल बुलकुंडे, छाया गजभिये, आनंद वानखेडे आदींचा सहभाग हाेता.

Web Title: Celebrate Republic Day with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.