संस्कृत विद्यापीठाचा स्थापनादिन साजरा

By Admin | Updated: September 21, 2015 03:05 IST2015-09-21T03:05:11+5:302015-09-21T03:05:11+5:30

कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ स्थापना दिवस शुक्रवारी रामटेक येथील मुख्यालयात साजरा करण्यात आला.

Celebrate the foundation day of Sanskrit University | संस्कृत विद्यापीठाचा स्थापनादिन साजरा

संस्कृत विद्यापीठाचा स्थापनादिन साजरा

नागपूर : कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ स्थापना दिवस शुक्रवारी रामटेक येथील मुख्यालयात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सतीश वटे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. उमा वैद्य होत्या. तसेच कुलसचिव डॉ. अरविंद जोशी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. वटे यांचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्थापना दिनाच्या निमित्ताने डॉ. उमा वैद्य यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्राचीन भारतीय पर्यावरण शिक्षा पदविका या अभ्यासक्रमाचे डॉ. वटे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. या अभ्यासक्रमात पक्षीतज्ज्ञ, प्रसिद्ध साहित्यिक मारुती चितमपल्ली, अनिल पिंपळापुरे यांच्यासह विविध विषयातील तज्ञांनी प्रवेश घेतला आहे. प्रसंगी डॉ. वटे यांनी प्राचीन भारतातील पर्यावरण विचार आधुनिक विज्ञानाशी कशाप्रकारे संलग्न आहे हे दाखवून देणारा अभ्यासक्रम सुरू केल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. दिनकर मराठे यांनी केले. आभार डॉ. कृष्णकुमार पाण्डेय यांनी मानले.(प्रतिनिधी)

Web Title: Celebrate the foundation day of Sanskrit University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.