पेंच व्याघ्र प्रकल्पाचा वर्धापन दिन साजरा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:09 IST2021-02-24T04:09:16+5:302021-02-24T04:09:16+5:30

यावेळी माजी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) बी. एस. हुडा, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. रविकिरण गोवेकर यांच्यासह ...

Celebrate the anniversary of the Pench Tiger Project () | पेंच व्याघ्र प्रकल्पाचा वर्धापन दिन साजरा ()

पेंच व्याघ्र प्रकल्पाचा वर्धापन दिन साजरा ()

यावेळी माजी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) बी. एस. हुडा, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. रविकिरण गोवेकर यांच्यासह सेंट्रल इंडिया बर्ड अकॅडमीचे डॉ. अनिल पिंपळापुरे तसेच बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक विलास पराते, व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक अमलेंदू पाठक, सहाय्यक वनसंरक्षक अतुल देवकर, सहाय्यक वनसंरक्षक किरण पाटील, वनरिक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविकात अतुल देवकर यांनी व्याघ्र प्रकल्पाची स्थापना ते आजतागायत झालेल्या महत्त्वपूर्ण घटनांचा आढावा घेतला. डॉ. रविकिरण गोवेकर यांनी येत्या वर्षात व्याघ्र प्रकल्पात हाती घेण्यात येणाऱ्या नवीन प्रकल्पांची माहिती दिली. वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यात पहिल्यांदाच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांच्या सुविधेसाठी सिल्लारी येथे एटीएम सुरू करण्यात आले. प्रकल्पाच्या संवर्धन आणि संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या वनपाल, वनरक्षक आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना यावेळी गौरविण्यात आले. संचालन स्नेहा राऊत यांनी तर किरण पाटील यांनी आभार मानले. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी आयाेजनात महत्त्वाची भूमिका बजावली.

Web Title: Celebrate the anniversary of the Pench Tiger Project ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.