CBSE XII Result: 'High Tide' of Girl Students' Success | सीबीएसई बारावीचा निकाल : विद्यार्थिनींच्या यशाचा ‘उंच झोका’

केतकी मोघे,अरुणव भौमिक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘सीबीएसई’तर्फे (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालात यंदादेखील विद्यार्थिनींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. वाणिज्य आणि विज्ञान या अभ्यासक्रमात मुलींनीच अव्वल क्रमांक पटकाविला आहे. विशेष म्हणजे यंदादेखील वाणिज्य शाखेतीलच विद्यार्थिनींनी अव्वल येण्याची परंपरा कायम ठेवली. एरवी निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या ‘सेलिब्रेशन’ने शाळांचा ‘कॅम्पस’ दणाणून निघतो. मात्र यंदा ‘कोरोना’मुळे ‘सेलिब्रेशन’ला मर्यादा आल्या.


बारावी ‘सीबीएसई’च्या परीक्षेला शहरातून अडीच हजारांहून हजार विद्यार्थी बसले होते. १५ फेब्रुवारी ते ३० मार्च या कालावधीत परीक्षा नियोजित होत्या. मात्र ‘कोरोना’मुळे १८ मार्चपर्यंतचेच पेपर होऊ शकले. त्यानंतरच्या पेपरसाठी ‘सीबीएसई’ने यंदा वेगळी पद्धत अवलंबली. निकाल कधी लागेल यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. जवळपास ३०० विद्यार्थ्यांना ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण आहेत. यात विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त असल्याची माहिती शाळांतर्फे देण्यात आली आहे. तिन्ही शाखांमधील पहिल्या २० मध्ये विद्यार्थिनींचेच प्रमाण अधिक आहे. मानव्यशास्त्र शाखेत बी.पी.भवन्स विद्यामंदिर (श्रीकृष्णनगर) येथील केतकी मोघे ही ९८.६ टक्के गुणांसह प्रथम आली. तर विज्ञान शाखेत सेंटर पॉर्इंट स्कूल (काटोल मार्ग) येथील विद्यार्थी अरुणव भौमिक याने ९८ टक्के गुणांसह अव्वल क्रमांक पटकाविला.

अनेक शाळांचे १०० टक्के निकाल
सामान्यत: विज्ञान विषयात जास्त गुण मिळतात, असा समज आहे. मात्र ‘सीबीएसई’च्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी यंदादेखील उल्लेखनीय कामगिरी करून शहरातून अव्वल स्थान पटकाविले. ‘मेट्रो’ शहरांप्रमाणे नागपुरातदेखील वाणिज्य शाखेला मागणी वाढत असून, अनेक गुणवंत विद्यार्थी इकडे वळत आहेत. येणाऱ्या काळात वाणिज्य शाखेवर विद्यार्थ्यांचा जास्त भर नक्कीच दिसून येईल, असा विश्वास अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी बोलून दाखविला. बहुतांश शाळांचे निकाल १०० टक्के लागले. मात्र काही शाळांमध्ये ‘टॉपर्स’चा टक्का मात्र खालावला व ९० टक्के गुण मिळविणारे कमी विद्यार्थी दिसून आले. शाळांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ‘सेंटर पॉईंट स्कूल (वर्धमाननगर), बी.पी.भवन्स विद्यामंदिर (सिव्हिल लाईन्स), बी.पी.भवन्स विद्यामंदिर (श्रीकृष्णनगर), सेंटर पॉईंट (काटोल रोड) या शाळांमध्ये सर्वात जास्त ‘टॉपर्स’ आहेत.

‘सर्व्हर’मुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप
‘सीबीएसई’ने संकेतस्थळावर १२.३० नंतर निकाल जाहीर केला. मात्र ‘सर्व्हर’वर ‘लोड’ आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अडचण आली. शाळांना तर विशेष मेहनत घ्यावी लागली. संथ संकेतस्थळामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचा निकाल पाहावा लागत होता.

वाणिज्य
क्रमांक नाव टक्के शाळा
१ दिव्या सूचक ९९.२ सेंटर पॉईंट स्कूल, वर्धमाननगर
२ प्रियादेवी सुथार ९८.६ भवन्स बी.पी.विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स
३ हृदय गोलानी ९७.६ सेंटर पॉईंट स्कूल, वर्धमाननगर
४ विश्वेश कुमार पारगी ९७.२ नारायणा विद्यालयम्
५ जिया अग्रवाल ९७.० सेंटर पॉईंट स्कूल, काटोल मार्ग
५ मिहीर उराडे ९७.० भवन्स बी.पी.विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर

विज्ञान
क्रमांक नाव टक्के शाळा
१ अरुणव भौमिक ९८.० सेंटर पॉईन्ट स्कूल, काटोल मार्ग
२ आशना चोप्रा ९७.४ सेंटर पॉईन्ट स्कूल, काटोल मार्ग
३ निशत बिरंजन ९७.० नारायणा विद्यालयम्
३ तनिष्क कोहली ९७.० सेंटर पॉईन्ट स्कूल, वर्धमाननगर
४ यश अग्रवाल ९६.६ भवन्स बी.पी.विद्यामंदिर, सिव्हील लाईन्स
४ साक्षी बोरेकर ९६.६ भवन्स बी.पी.विद्यामंदिर, सिव्हील लाईन्स
५ नकुल मुखी ९६.४ भवन्स बी.पी.विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर
५ जान्हवी चौधरी ९६.४ सेंट पॉल सिनिअर सेकंडरी स्कूल, हुडकेश्वर

मानव्यशास्त्र
क्रमांक नाव टक्के शाळा
१ केतकी मोघे ९८.६ भवन्स बी.पी.विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर
२ प्रसाद केळकर ९७.९ केंद्रीयव विद्यालय, वायुसेनानगर
२ खुशी पटेल ९६.८ भवन्स बी.पी.विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर
३ अद्विका सराफ ९६.० सेंटर पॉईन्ट स्कूल, काटोल मार्ग
४ निश्ता चांडक ९५.८ भवन्स बी.पी.विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर
४ देवयानी टाले ९५.८ सेंटर पॉईन्ट स्कूल, काटोल मार्ग
५ यशिका लालवानी ९५.४ सेंटर पॉईन्ट स्कूल, काटोल मार्ग

Web Title: CBSE XII Result: 'High Tide' of Girl Students' Success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.