शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

४७ डिग्री तापमानात नागपुरात सीबीएसईच्या शाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 21:34 IST

नागपूरसह विदर्भातील तापमान लक्षात घेता, २६ जूनपासून शाळा सुरू व्हाव्यात, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला दिले आहे. पण या आदेशाकडे सीबीएसईच्या शाळा पुरत्या दुर्लक्ष करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमान ४७ डिग्रीवर असताना, काही सीबीएसई शाळा सुरू झाल्या आहेत. दुपारी १२.३० वाजेपर्यंत शाळा सुरू ठेवून, सीबीएसई बोर्डाच्या शाळांनी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशच मानत नाही, असे दाखवूनच दिले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली : शिक्षण विभागाकडून बघ्याची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरसह विदर्भातील तापमान लक्षात घेता, २६ जूनपासून शाळा सुरू व्हाव्यात, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला दिले आहे. पण या आदेशाकडे सीबीएसईच्या शाळा पुरत्या दुर्लक्ष करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमान ४७ डिग्रीवर असताना, काही सीबीएसई शाळा सुरू झाल्या आहेत. दुपारी १२.३० वाजेपर्यंत शाळा सुरू ठेवून, सीबीएसई बोर्डाच्या शाळांनी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशच मानत नाही, असे दाखवूनच दिले आहे.गेल्या आठवडाभरापासून नागपुरात सातत्याने तापमान ४७ डिग्री सेल्सिअसवर जात आहे. दररोज उष्माघाताने मरणाऱ्यांची संख्या वाढते आहे. सकाळपासूनच उन्हाचा तडाखा इतका असतो की बाहेर पडणे कठीण झाले आहे. नागपूरकरांनी एकप्रकारे उन्हाचा धसकाच घेतला आहे. अशा वातावरणात सीबीएसई शाळेच्या व्यवस्थापनाने शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना शाळेत बोलाविले आहे. सोमवारी पूर्व नागपुरातील सीबीएसई बोर्डाच्या एका प्रसिद्ध शाळेने ८ ते १० वर्ग सुरू केले. सकाळी ७ ते दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान शाळा सुरू होती. पण जिल्हा प्रशासनाने एकीकडे शाळा २६ जूननंतर सुरू करण्याचे निर्देश दिले असताना, ३ जूनपासून शाळा कशी सुरू झाली, यावर पालकांनीही आक्षेप घेतला. पण शाळा व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयामुळे पालकांनी विनातक्रार मुलांना शाळेत पाठविले. शाळा संपल्यानंतर भर दुपारी विद्यार्थी खांद्यावर दप्तराचे ओझे घेऊन उन्हात घरी परतले. उन्हाच्या तडाख्यामुळे प्रत्येक जण हैराण असताना, या विद्यार्थ्यांची अवस्था केविलवाणी झाली होती. सीबीएसई शाळांच्या बाबतीत शिक्षण विभाग उदासीनजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही सीबीएसईच्या शाळा ३ जूनपासून कशा सुरू झाल्या, यासंदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, चौकशी करावी लागेल. यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांनाही अवगत केल्यानंतर त्या शाळेचा सीबीएसईच्या संदर्भातील टाइमटेबल बघावा लागेल, असे सांगितले. सीबीएसई शाळेच्या अशा हेकेखोर भूमिकेवर शिक्षण विभागाकडून बघ्याची भूमिका घेतली जाते आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली होत असताना, बघावं लागेल, चौकशी करावी लागेल, असे वक्तव्य प्रशासनाकडून अनपेक्षित आहे.

टॅग्स :SchoolशाळाTemperatureतापमानStudentविद्यार्थीNagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय