नागपूरसह ठिकठिकाणी सीबीआयची छापामारी : संबंधित वर्तुळात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:46 PM2019-08-30T23:46:08+5:302019-08-30T23:46:48+5:30

भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) नागपूरसह देशभरातील १५० ठिकाणी छापे मारले.

CBI raid at Nagpur and many places : sensation | नागपूरसह ठिकठिकाणी सीबीआयची छापामारी : संबंधित वर्तुळात खळबळ

नागपूरसह ठिकठिकाणी सीबीआयची छापामारी : संबंधित वर्तुळात खळबळ

Next
ठळक मुद्देमहत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) नागपूरसह देशभरातील १५० ठिकाणी छापे मारले. यातून सीबीआयच्या पथकाने भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराशी संबंधित महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त केल्याचे सांगितले जाते.
रेल्वे, परिवहन, बँक, बीएसएनएल या विभागांसह सामान्य जनतेशी संबंधित किमान २५ सरकारी विभागात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराच्या सरकारकडे वारंवार तक्रारी येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी देशभरातील सुमारे १५० ठिकाणी सीबीआयने एकाच वेळी छापे मारले.
सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआयने नागपूरसह मुंबई, पुणे, दिल्ली, जयपूर, जोधपूर, गुवाहाटी, श्रीनगर, शिलाँग, चंदीगड, सिमला, चेन्नई, मदुराई, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरु, गांधीनगर, गोवा, भोपाळ, जबलपूर, पाटणा, रांची, गाझियाबाद, लखनौ आणि डेहराडून येथील १५० ठिकाणांवर छापेमारी केली. यानंतर कुणी स्पष्ट बोलले नाही. मात्र, रेल्वे, परिवहन, बँक, बीएसएनएल यासह किमान २५ विभागांची या मोहिमेंतर्गत चौकशी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या विभागाच्या कार्यालयात जाऊन तेथे सामान्य जनतेच्या तक्रारींचा निपटारा कशा प्रकारे केला जातो, या प्रक्रियेत भ्रष्टाचार होत आहे का, याची पडताळणीही सीबीआयची पथकं करीत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
सूत्रांच्या माहितीनुसार, नागपूर सीबीआय आणि रेल्वे सर्व्हिलन्स विभागाने संयुक्तपणे नागपूरसह छिंदवाडा आणि नयनपूर (मध्य प्रदेश) मध्ये छापेमारी केली. कोट्यवधींच्या कामात गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून ही छापेमारी करण्यात आल्याचे सांगितले जाते. या छापेमारीत सीबीआयच्या हाती काय लागले, ते स्पष्ट करण्यास सूत्रांनी नकार दिला. कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झाली नसली तरी भ्रष्टाचाराशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, सीबीआयने छापेमारी केल्याच्या वृत्ताने उपराजधानीतील विशिष्ट वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली होती.

Web Title: CBI raid at Nagpur and many places : sensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.