शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कॉर्पोरेट इस्पातच्या आॅफीसवर सीबीआयची धाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 22:36 IST

कोलकता येथून आलेल्या सीबीआयच्या अधिकऱ्यांनी बुधवारी नागपुरातील कॉर्पोरेट इस्पात लिमिटेडच्या आॅफीसवर धाड टाकली. ही कंपनी अभिजित ग्रुपची सहायक कंपनी आहे. या कंपनीचे प्रमुख उद्योगपती मनोज जयस्वाल आहेत.

ठळक मुद्देलातेहार कोल ब्लॉक प्रकरणात करण्यात आली कारवाई : तब्बल नऊ तास तपासणी

लोकमत न्यूज नटवर्कनागपूर : कोलकता येथून आलेल्या सीबीआयच्या अधिकऱ्यांनी बुधवारी नागपुरातील कॉर्पोरेट इस्पात लिमिटेडच्या आॅफीसवर धाड टाकली. ही कंपनी अभिजित ग्रुपची सहायक कंपनी आहे. या कंपनीचे प्रमुख उद्योगपती मनोज जयस्वाल आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सहा सीबीआयच्या अधिकाऱ्यांची एक चमू कॉर्पोरेट इस्पातच्या आॅफीसमध्ये धडकली. सकाळी सुमारे ९.३० वाजता ही कारवाई सुरू झाली ती सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत चालली. या धाडीत सीबीआयने काही दस्तावेज किंवा इतर किमती साहित्य जप्त केले की नाही, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. विश्वस्त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉर्पोरेट इस्पात कंपनीने बिहारमध्ये १३३० मेगावॅट क्षमतेच्या विद्युत संयंत्राची योजना तयार केली होती. याच संयंत्रासाठी २००७ साली कंपनीला बिहारमधील लातेहार जिल्ह्यातील कोल ब्लॉक वितरित करण्यात आले होते. यानंतर २०१२ मध्ये या गोष्टीचा खुलासा झाला की, कंपनीने अनुचित पद्धतीने हा कोल ब्लॉक मिळविला होता. २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या वितरणासोबतच अन्य २०४ कोल ब्लॉकचे वितरणही रद्द केले होते.सविस्तर तपासानंतर सीबीआयने कॉर्पोरेट इस्पातच्या निदेशकांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. यात मनोज जयस्वाल यांच्याशिवाय त्यांची दोन मुले अभिषेक आणि अभिजित व कंपनीच्या काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सूत्रानुसार बुधवारची कारवाई ही याच प्रकरणाशी जुळलेली आहे.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागraidधाड