माेबाईल व्हॅनद्वारे वाॅर्डावाॅर्डात काेविड चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:12 IST2021-03-04T04:12:03+5:302021-03-04T04:12:03+5:30
सावनेर : दिवसेंदिवस काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, त्यावर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने महसूल प्रशासन, सावनेर नगरपालिका आणि आराेग्य विभाग ...

माेबाईल व्हॅनद्वारे वाॅर्डावाॅर्डात काेविड चाचणी
सावनेर : दिवसेंदिवस काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, त्यावर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने महसूल प्रशासन, सावनेर नगरपालिका आणि आराेग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सावनेर शहरातील वाॅर्डावाॅर्डात माेबाईल व्हॅनच्या माध्यमातून काेविड चाचणी उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत १०५ नागरिकांची काेविड चाचणी करण्यात आली.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, डाॅ. पवन मेश्राम, नायब तहसीलदार चैताली दराडे, नगरपालिका प्रशासन अधिकारी दिनेश बुधे, काेविड नाेडल अधिकारी डाॅ. प्रीतम निचंत, डाॅ. संदीप गुजर आदी उपस्थित हाेते. शिवाजी पुतळा परिसरातील वाॅर्ड क्रमांक ८, नाईक ले-आऊट येथून या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर राधाकृष्ण मंदिर परिसर, महाजन ले-आऊट, खेडकर ले-आऊट, लाड ले-आऊट, दत्त मंदिर परिसर, विंचूरकर ले-आऊट अशी टप्प्याटप्प्याने चाचणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी १०५ नागरिकांची काेविड चाचणी करण्यात आली. यात वयाेवृद्ध नागरिकांनीही लाभ घेतला. बहुतांश नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने चाचणी करून घेतली. या उपक्रमासाठी विनायक पाटाेडे, शेषराव वाढीकर, अशोक मेंढे, अभियंता पुरुषोत्तम पांडे, प्रदीप गवई, आकाश नाईक, धीरज देशमुख, सूरज धोके आदींनी सहकार्य केले.