काेराडीत आजपासून सुरू हाेणार काेविड केअर सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:11 IST2021-04-30T04:11:20+5:302021-04-30T04:11:20+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : महादुला, काेराडी परिसरात काेराेनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, काेराडी महानिर्मितीच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत ...

काेराडीत आजपासून सुरू हाेणार काेविड केअर सेंटर
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : महादुला, काेराडी परिसरात काेराेनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, काेराडी महानिर्मितीच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेले व सध्या शालिनीताई मेघे हाॅस्पिटलच्या अखत्यारित असलेल्या स्वामी विवेकानंद रुग्णालयात काेविड केअर सेंटर उभारणीला मंजुरी देण्यात आली आहे. शासनाने हे रुग्णालय ताब्यात घेतले असून, या ठिकाणी २० बेडची व्यवस्था केली आहे. त्यापैकी १० ऑक्सिजन बेडची सुविधा असणार आहे. या काेविड सेंटरमध्ये शासकीय रुग्णालयातील अनुभवी डाॅक्टर तसेच मेघे ग्रुपचे काही डाॅक्टर सेवा देणार असून, शुक्रवार (दि.३०) पासून हे सेंटर सुरू हाेणार आहे.
यासंदर्भात तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती डाॅ. अश्विन रडके यांनी दिली. या ठिकाणी काेविड केअर सेंटर सुरू झाल्याने आराेग्य यंत्रणेवरील ताण काही प्रमाणात कमी हाेईल, तसेच स्थानिक रुग्णांना मदत हाेणार असल्याचे महादुलाचे नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी सांगितले. कोराडी ग्रामपंचायतीच्या वतीने हे सेंटर सुरू करण्यास शक्य ती सर्व मदत केली जात असल्याची माहिती सरपंच नरेंद्र धानोले व उपसरपंच आशिष राऊत यांनी दिली. या ठिकाणी सुरू असलेले लसीकरण केंद्र बाजूलाच तालुका क्रीडा संकुलात स्थानांतरित करण्यात आले आहे. देवी मंदिर परिसरात असलेले २०० खोल्यांचे भक्तनिवास सध्या कोरोना संक्रमित रुग्णांसाठी क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरणे संदर्भातही शासकीय स्तरावरून तयारी सुरू आहे. या भागात आतापर्यंत आठ हजारावर बाधित रुग्ण आढळले असून, ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.