रामटेक शहरात काेविड केअर सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:09 IST2021-03-28T04:09:01+5:302021-03-28T04:09:01+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तालुक्यातील काेराेना रुग्णांची वाढती संख्या आणि नागपूर शहरातील काेविड केअर सेंटरमधील खाटांची कमतरता आणि ...

रामटेक शहरात काेविड केअर सेंटर सुरू
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : तालुक्यातील काेराेना रुग्णांची वाढती संख्या आणि नागपूर शहरातील काेविड केअर सेंटरमधील खाटांची कमतरता आणि त्या सेंटरवर पडणारा ताण लक्षात येता, रामटेक शहरात शुक्रवार (ता. २६ मार्च)पासून काेविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. दुसरे सेंटर दाेन दिवसांत सुरू केले जाणार असल्याची माहितीही तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिली.
रामटेक शहरासह तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत असताना त्या रुग्णांवर शहरात उपचाराची काेणतीही प्रभावी साेय नव्हती. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी नागपूर शहरात हलवावे लागायचे. नागपुरात शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील रुग्ण उपचाराला येत असल्याने तेथील खाटांची संख्या अपुरी पडायला लागली. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात उपचाराला गेलेल्या रुग्णांची माेठी गैरसाेय हाेत हाेती. ही समस्या ‘लाेकमत’ने लावून धरली हाेती. ही गैरसाेय दूर करण्यासाठी रामटेक शहरातील याेगीराज स्वामी सीताराम महाराज हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये काेविड केअर सेंटर सुरू करण्यास प्रशासनाने मंजुरी दिली. त्यामुळे येथे शुक्रवारपासून काेविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून, तिथे सध्या ३५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
शहरातील नगरपालिकेच्या सूतिकागृहात दुसरे काेविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. ते सेंटर येत्या तीन - चार दिवसांत सुरू हाेणार असल्याचेही तहसीलदार बाळासाहेब मस्के व तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. चेतन नाईकवार यांनी सांगितले. या सेंटरमुळे गरीब नागरिकांच्या उपचाराची साेय झाली आहे. दुसरीकडे, तालुक्यात काेराेनामुळे हाेणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करण्याचे आवाहनही या दाेन्ही अधिकाऱ्यांनी केले आहे.
...
शासकीय दरानुसार उपचार
या काेविड केअर सेंटरमध्ये डाॅक्टर, कर्मचारी व औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या नियम व दरानुसार रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. चेतन नाईकवार यांनी दिली. तालुक्यात या आठवडाभरात काेराेनाचे २५० च्या वर रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे संक्रमण राेखण्यासाठी नागरिकांनी उपाययाेजनांचे पालन करणे गरजेचे आहे.