गुरांच्या अवैध वाहतुकीचे वाहन पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:08 IST2021-05-09T04:08:54+5:302021-05-09T04:08:54+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क उमरेड : पाेलिसांच्या पथकाने गंगापूरफाटा परिसरात केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले. यात वाहनचालकास ...

Caught a vehicle transporting cattle illegally | गुरांच्या अवैध वाहतुकीचे वाहन पकडले

गुरांच्या अवैध वाहतुकीचे वाहन पकडले

लाेकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : पाेलिसांच्या पथकाने गंगापूरफाटा परिसरात केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले. यात वाहनचालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एकूण ८ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. शिवाय, वाहनातील ११ गुरांची सुटका केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. ७) सकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

उमरेड पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना नागपूर-गडचिराेली मार्गाने गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या मार्गावरील गंगापूरफाटा परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. दरम्यान, त्यांनी नागपूरच्या दिशेने जात असलेले एमएच-३६/एए-२३०४ क्रमांकाचे छाेटे मालवाहू वाहन थांबवून झडती घेतली. त्या वाहनात ११ जनावरे काेंबली असल्याचे आढळून येताच पाेलिसांनी कागदपत्रांची तपासणी केली. त्यात ती गुरांची अवैध वाहतूक असल्याचे तसेच ती सर्व जनावरे कत्तलखान्यात नेली जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पाेलिसांनी वाहनचालक रज्जाक अशाेक सावरकर (२६, रा. पवनी, जिल्हा भंडारा) यास अटक केली. त्याच्याकडून ७ लाख ८० हजार रुपये किमतीचे वाहन आणि एक लाख रुपये किमतीची जनावरे असा एकूण ८ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या सर्व जनावरांना नजीकच्या गाेरक्षणमध्ये पाठविण्याची व्यवस्थाही पाेलिसांनी केली. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार किशाेर ठाकूर करीत आहेत.

Web Title: Caught a vehicle transporting cattle illegally