रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:09 IST2021-01-17T04:09:33+5:302021-01-17T04:09:33+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क देवलापार : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देवलापार (ता. रामटेक) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चाेरबाहुली (ता. रामटेक) शिवारात ...

Caught a sand transport tractor | रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला

रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला

लाेकमत न्यूज नेटवर्क

देवलापार : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देवलापार (ता. रामटेक) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चाेरबाहुली (ता. रामटेक) शिवारात कारवाई करीत रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. त्यात दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करून चालकास अटक केली. शिवाय, त्याच्याकडून एकूण ५ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देवलापार परिसरात गस्तीवर असताना त्यांना चाेरबाहुली शिवारातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या शिवाराची पाहणी केली. यात त्यांनी एमएच-४०/बी-७१२५ क्रमांकाचा ट्रॅक्टर थांबवून झडती घेतली. त्या ट्रॅक्टरच्या ट्राॅलीत रेती आढळून येताच कागदपत्रांची तपासणी केली. त्यात ती रेती विना राॅयल्टी वाहून नेली जात असल्याचे उघड झाले. त्यामुळे पाेलिसांनी ट्रॅक्टरचालक विकास बाबूराव ढाेंगे (३६, रा. सराखा बाेर्डा, ता. रामटेक) यास अटक केली. शिवाय, त्याने हरीसिंग यादव, रा. चाेरबाहुली याच्या सांगण्यावरून रेतीची उचल व वाहतूक केल्याचे सांगितल्याने हरीसिंगविरुद्धही गुन्हा नाेंदविण्यात आला.

या कारवाईमध्ये पाच लाख रुपयांचा ट्रॅक्टर आणि पाच हजार रुपयांची एक ब्रास रेती असा एकूण ५ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस उपनिरीक्षक सचिन मत्ते यांच्या नेतृत्वातील पथकाने केली. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी भादंवि ३७९, १०९ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Caught a sand transport tractor