अवैध दारू वाहतुकीची कार पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:07 IST2021-06-23T04:07:13+5:302021-06-23T04:07:13+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चनकापूर (ता. सावनेर) येथील ...

अवैध दारू वाहतुकीची कार पकडली
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चनकापूर (ता. सावनेर) येथील मिलन चाैकात केलेल्या कारवाईमध्ये देशी दारूची अवैध वाहतूक करणारी कार पकडली. यात कारचालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून कार व दारूच्या बाटल्या असा एकूण २ लाख ७० हजार १६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई साेमवारी (दि. २१) रात्री ११ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
विशाल शंभू मंडल (२२, रा. चनकापूर, ता. सावनेर) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी कारचालकाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक साेमवारी रात्री खापरखेडा परिसरात गस्तीवर हाेते. त्यांना दहेगाव (रंगारी) परिसरातून दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती प्राप्त झाली हाेती. त्यामुळे त्यांनी दहेगाव (रंगारी)-खापरखेडा मार्गावर मीलन चाैक, चनकापूर येथून जाणाऱ्या चारचाकी वाहनांवर नजर ठेवली हाेती. संशय आल्याने त्यांनी पिपळा (डाकबंगला) येथून दहेगाव (रंगारी) मार्गे खापरखेडा येथे जप्त असलेली एमएच-३१/एएच-९०८९ क्रमांकाची कार थांबवून झडती घेतली.
त्या कारमध्ये देशी दारूच्या २८८ बाटल्या आढळून आल्या. ती दारूची अवैध वाहतूक असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी कारचालकास अटक केली आणि कारसह दारूच्या बाटल्या ताब्यात घेतल्या. या कारवाईमध्ये २ लाख ५० हजार रुपयांची कार व २० हजार १६० रुपये किमतीची देशी दारू असा एकूण २ लाख ७० हजार १६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत, सहायक फौजदार लक्ष्मीप्रसाद दुबे, विनोद काळे, वीरेंद्र नरड, महेश जाधव, प्रणय बनाफर, भाऊराव खंडाते, शैलेश यादव, सत्यशील कोठारे यांच्या पथकाने केली.