गुरांच्या वाहतुकीचा कंटेनर पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:08 IST2021-05-27T04:08:43+5:302021-05-27T04:08:43+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : पाेलिसांनी माेहपा फाटा परिसरात कारवाई करीत गुरांच्या अवैध वाहतुकीचा कंटेनर पकडला. यात चार आराेपींना ...

Caught a cattle transport container | गुरांच्या वाहतुकीचा कंटेनर पकडला

गुरांच्या वाहतुकीचा कंटेनर पकडला

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर : पाेलिसांनी माेहपा फाटा परिसरात कारवाई करीत गुरांच्या अवैध वाहतुकीचा कंटेनर पकडला. यात चार आराेपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १६ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि.२५) दुपारच्या सुमारास करण्यात आली.

मनाेज कुंजीलाल मीना (३०, रा. परवलिया सडक, जि. भाेपाल), माेहम्मद जाकीर माेहम्मद जहीर (३७, रा. बाग उंबरादुला, जि. भाेपाल), अजूर रहिमतुल्ला वाहीत खान (२७, रा. माैरासा, जि. भाेपाल) व अमित कमरली खान (१९, रा. बाबाझिया, जि. विदिशा) अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. सावनेर-काटाेल मार्गे जनावरांची अवैध वाहतूक केली जात असल्याची गुप्त सूचना सावनेर पाेलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे सावनेर-काटाेल मार्गावरील माेहपा फाटा परिसरात पाेलिसांनी नाकाबंदी सुरू केली हाेती. दरम्यान, एपी-१३/एक्स-७७०० क्रमांकाचा कंटेनर थांबवून तपासणी केली असता, कंटेनरमध्ये ६६ जनावरे काेंबून त्यांची हैदराबादकडे वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. ही गुरांची अवैध वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच, पाेलिसांनी आराेपींना ताब्यात घेत अटक केली. या कारवाईत सहा लाख ६० हजारांची ६६ जनावरे व १० लाखांचा कंटेनर असा एकूण १६ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला आहे. ही कारवाई पाेलीस निरीक्षक मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनात पाेलीस उपनिरीक्षक विनाेद मांढरे, हवालदार अशाेक आठवले, आशिष कारेमाेरे, दिनेश काकडे, धाेंडिबा नागरगाेजे यांच्या पथकाने केली.

Web Title: Caught a cattle transport container