पंचधार येथून गुरांची चाेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:09 IST2021-09-25T04:09:18+5:302021-09-25T04:09:18+5:30
काेंढाळी : चाेरट्याने गाेठ्यात बांधलेली दाेन जनावरे चाेरून नेल्याची घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचधार येथे बुधवारी ...

पंचधार येथून गुरांची चाेरी
काेंढाळी : चाेरट्याने गाेठ्यात बांधलेली दाेन जनावरे चाेरून नेल्याची घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचधार येथे बुधवारी (दि. २२) मध्यरात्री घडली. त्या दाेन्ही गुरांची एकूण किंमत १५ हजार रुपये आहे.
संपूर्ण गाव गाढ झाेपेत असताना चाेरट्याने हरिदास नामदेव बाहेकर, रा. पंचधार, ता. काटाेल यांच्या गाेठ्याच्या दाराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला व गाेठ्यातील १० हजार रुपये किमतीचा गाेऱ्हा चाेरून नेला. त्यानंतर चाेरट्याने पंचधार येथील काैसल्याबाई यांच्या गाेठ्यात प्रवेश केला व त्यांची पाच हजार रुपये किमतीची कालवड चाेरून नेली. या दोन्ही घटना गुरुवारी (दि. २३) सकाळी उघड हाेताच त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ३७९, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार भाेजराज तांदूळकर करीत आहेत.