शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मांजरीला ‘शॉक’, वीज झाली ‘स्टॉप’ : महावितरण कर्मचाऱ्यांची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:30 IST

सोमवारी पहाटेच्या सुमारास रामदासपेठ ते अमरावती मार्गापर्यंतच्या परिसरात अचानक वीज पुरवठा खंडित झाला. लगेच फोनाफोनी सुरू झाली आणि नेमके कारण शोधण्याची सुरुवात झाली. महावितरण कर्मचाऱ्यांच्या डोळ्यासमोर जे चित्र आले ते त्यांनादेखील धक्का देणारे होते. महाराजबागेजवळील सीताबर्डी सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मरजवळ एका मांजरीचा विजेच्या ‘शॉक’ने कोळसा झाला होता व त्यामुळे संपूर्ण भागाच्या वीजपुरवठ्याला फटका बसला होता. कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनादेखील प्रत्यक्ष यावे लागले व अखेर अनेक तासांच्या प्रयत्नानंतर सुरळीत वीज पुरवठा सुरू झाला.

ठळक मुद्देनागपुरातील रामदासपेठ ते अमरावती मार्गावर ‘बत्ती गुल’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी पहाटेच्या सुमारास रामदासपेठ ते अमरावती मार्गापर्यंतच्या परिसरात अचानक वीज पुरवठा खंडित झाला. लगेच फोनाफोनी सुरू झाली आणि नेमके कारण शोधण्याची सुरुवात झाली. महावितरण कर्मचाऱ्यांच्या डोळ्यासमोर जे चित्र आले ते त्यांनादेखील धक्का देणारे होते. महाराजबागेजवळील सीताबर्डी सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मरजवळ एका मांजरीचा विजेच्या ‘शॉक’ने कोळसा झाला होता व त्यामुळे संपूर्ण भागाच्या वीजपुरवठ्याला फटका बसला होता. कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनादेखील प्रत्यक्ष यावे लागले व अखेर अनेक तासांच्या प्रयत्नानंतर सुरळीत वीज पुरवठा सुरू झाला.पहाटे ३.४५ च्या सुमारास महाराजबागजवळील सीताबर्डी सबस्टेशन येथे मोठा आवाज झाला व वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणचे कर्मचारी तेथे पोहोचले व त्यांना तिथे जळालेली मांजरच दिसली. मानकापूर सबस्टेशन येथून आलेल्या ३३ केव्ही लाईनला ट्रान्सफॉर्मरला जोडणाऱ्या ‘बस’च्या संपर्कात ही मांजर आली होती. विजेचा धक्का इतका तीव्र होता की मांजर अनेक फूट दूर जाऊन पडली. या घटनेमुळे ‘फीडर’ ट्रीप झाले व रामदासपेठ, काचीपुरा चौक, अमरावती मार्गापर्यंतची वीज गेली. महावितरणने ही माहिती तत्काळ महापारेषणच्या मानकापूर स्थित सबस्टेशनला दिली. तेथून लाईन सुरू करताच १० एमव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरचा ब्रेकर जाम झाला. लाईन परत बंद झाल्यामुळे अतिरिक्त कार्यकारी अभियंता उदय फरासखानावाला तेथे पोहोचले. फटका बसलेल्या भागांना इतर ट्रान्सफॉर्मर्ससोबत जोडण्याचा प्रयत्न झाला, मात्र ‘कपल ब्रेकर’मधून धूर निघू लागल्याने त्यात यश आले नाही. अखेर सकाळी ५.३० च्या सुमारास तांत्रिक अडथळे दूर करून वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली.

टॅग्स :Power Shutdownभारनियमनnagpurनागपूर