पतंग पकडणे जीवावर बेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:10 IST2020-12-02T04:10:54+5:302020-12-02T04:10:54+5:30
माैदा : नदीच्या काठावर पतंग पकडण्याच्या नादात ताेल गेल्याने पात्रातील पाण्यात पडला आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. ही ...

पतंग पकडणे जीवावर बेतले
माैदा : नदीच्या काठावर पतंग पकडण्याच्या नादात ताेल गेल्याने पात्रातील पाण्यात पडला आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील किरणापूर शिवारात नुकतीच घडली.
आकाश काशिनाथ मेश्राम (२०, रा. किरणापूर, ता. माैदा) असे मृताचे नाव आहे. काही तरुण किरणापूर शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या काठी पतंग उडवित हाेते. यातील कटलेली एक पतंग पकडण्यासाठी आकाश सरसावला. ती पकडण्याच्या नादात ताेल गेल्याने ताे नदीत पडला. खाेल पाण्यात गेल्याने तसेच त्याला पाेहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा पुढील तपास पाेलीस कर्मचारी राेहित आडे करीत आहेत.