ई-कॉमर्स आणि जीएसटीवर कॅट सुरू करणार राष्ट्रीय अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:08 IST2021-02-08T04:08:08+5:302021-02-08T04:08:08+5:30

नागपूर : कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) लवकरच विदेशी ई-कॉमर्स दिग्गजांतर्फे निरंतर करण्यात येणारी व्यावसायिक मनमानी आणि दडपशाही ...

CAT will launch a national campaign on e-commerce and GST | ई-कॉमर्स आणि जीएसटीवर कॅट सुरू करणार राष्ट्रीय अभियान

ई-कॉमर्स आणि जीएसटीवर कॅट सुरू करणार राष्ट्रीय अभियान

नागपूर : कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) लवकरच विदेशी ई-कॉमर्स दिग्गजांतर्फे निरंतर करण्यात येणारी व्यावसायिक मनमानी आणि दडपशाही धोरणांविरुद्ध एक आक्रमक राष्ट्रव्यापी आंदोलन सुरू करण्यासाठी तयार आहे. या अभियानाला यशस्वी बनविण्यासाठी देशाच्या सर्व राज्यांतील २०० पेक्षा जास्त प्रमुख व्यापारी नेते ८ ते १० फेब्रुवारीपर्यंत ‘कॅट’तर्फे नागपुरात प्राईड हॉटेलमध्ये आयोजित तीनदिवसीय राष्ट्रीय व्यापारी संमेलनात भाग घेणार आहेत. या संमेलनात देशातील व्यापारी नेते जीएसटीचे सरळीकरणसंदर्भात एक धोरण तयार करतील आणि त्यामध्ये व्यापार बंदचा निर्णयही घेतला जाऊ शकतो.

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल म्हणाले, देशातील व्यापारी कोणत्याही विदेशी वा घरगुती ई-कॉमर्स कंपन्यांविरुद्ध नाही. पण या कंपन्या गुंतवणुकीपेक्षा कमी किमतीत माल विकणे, जास्त सवलत, आपल्याच पोर्टलवर ब्रॅण्डची विक्री, माहिती प्रकाशित न करता कोणत्याही देशाच्या मालाची विक्री करणे आदी प्रकार करत आहेत. या गोष्टी भारतीय व्यावसायिकांसाठी हानीकारक असून व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. अशा गोष्टी सहन करण्यापलीकडे आणि व्यावसायिक धोरणांविरुद्ध आहेत. कॅट अशा ई-कॉमर्स कंपन्या एकतर भारतीय कायद्याचे पालन करण्यास वा व्यवसाय भारतातून हद्दपार करण्यासाठी बाध्य करणार आहे. यासंदर्भात पुढील धोरणांची घोषणा ९ फेब्रुवारीला करण्यात येणार आहे.

Web Title: CAT will launch a national campaign on e-commerce and GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.