व्यापाऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी ‘कॅट’चा पुढाकार
By Admin | Updated: June 27, 2014 00:40 IST2014-06-27T00:40:06+5:302014-06-27T00:40:06+5:30
रिटेल ई-कॉमर्समध्ये विदेशी गुंतवणुकीला देशाच्या सर्व राज्यातील किरकोळ व्यापारी संघटना विरोध करतील, असा निर्णय देशातील किरकोळ व्यापाऱ्यांची शिखर संघटना कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने

व्यापाऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी ‘कॅट’चा पुढाकार
नवी दिल्लीत संमेलन : रिटेल ई-कॉमर्समध्ये विदेशी गुंतवणुकीला विरोध
नागपूर : रिटेल ई-कॉमर्समध्ये विदेशी गुंतवणुकीला देशाच्या सर्व राज्यातील किरकोळ व्यापारी संघटना विरोध करतील, असा निर्णय देशातील किरकोळ व्यापाऱ्यांची शिखर संघटना कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय संमेलनात घेतला.
किरकोळ व्यवसायाशी संबंधित या संवेदनशील मुुद्यावर केंद्र सरकारने विचाराअंती निर्णय घ्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. संमेलनात कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया, राष्ट्रीय महासचिव प्रवीण खंडेलवाल यांच्यासह देशाच्या सर्व राज्यातील २०० पेक्षा अधिक व्यापारी नेते उपस्थित होते.
९ आॅगस्टला व्यापार बचाव रॅली
कॅटच्यावतीने ९ आॅगस्टला नवी दिल्लीत किरकोळ व्यापार बचाव रॅली काढण्यात येणार असून देशाच्या सर्व राज्यातील किरकोळ व्यापारी रॅलीत सहभागी होणार आहेत. देशात किरकोळ व्यवसायात रिटेल ई-कॉमर्समध्ये विदेशी गुंतवणुकीची सध्या आवश्यकता नाही. देशात सद्यस्थितीत काम करणाऱ्या व्यापाऱ्यांना ई-कॉमर्सचा अवलंब करण्यावर जागरूक करण्यासाठी एक राष्ट्रीय मोहीम राबविण्याची गरज असल्याचा सूर व्यापाऱ्यांनी काढला. ई-कॉमर्सच्या माध्यमातून व्यवसाय वाढीसाठी केंद्राने भारतीय व्यापाऱ्यांसाठी एक धोरण तयार करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (प्रतिनिधी)