जात पडताळणी प्रमाणपत्र निर्णय प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:09 IST2021-07-31T04:09:51+5:302021-07-31T04:09:51+5:30
कैलास निघाेट लाेकमत न्यूज नेटवर्क देवलापार : डाेंगरताल (ता. रामटेक) ग्रामपंचायतच्या निवडणुकीत २०१९ मध्ये नितेश श्रीराम सोनवणे हे अनुसूचित ...

जात पडताळणी प्रमाणपत्र निर्णय प्रलंबित
कैलास निघाेट
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : डाेंगरताल (ता. रामटेक) ग्रामपंचायतच्या निवडणुकीत २०१९ मध्ये नितेश श्रीराम सोनवणे हे अनुसूचित जमाती राखीव प्रवर्गातून सरपंचपदासाठी विजयी झाले हाेते. त्यांनी आपण माना जातीचे असल्याचा दावा करीत जात वैधता प्रमाणपत्र राज्य निवडणूक आयाेगाला सादर केले हाेते. मात्र, त्यांनी सादर केलेले जात वैधता प्रमाणपत्र बनावट असल्याचे चाैकशीत स्पष्ट झाले असून, त्यासाठी ते तयार करण्यासाठी २० हजार रुपये दिल्याचे त्यांनी कबूल केले, अशी माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणाचा अंतिम निर्णय प्रलंबित आहे.
नितेश साेनवणे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय रामटेक येथील ५ सप्टेबर २०१८ ला त्यांचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले हाेते. त्या प्रमाणपत्रावर माना जातीचा उल्लेख असल्याने माना जमातीच्या दाव्यासाठी अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र तपासणी समितीकडे २६ फेबु्वारी २०१९ राेजी प्रस्ताव सादर करण्यात आला. या समितीच्या १८ जानेवारी २०२० राेजी जातीचा महसुली दाखला बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या जातीची महसुली दस्तऐवजात कुणबी माना असल्याचे या समितीच्या दक्षता पथकाने शोधून काढले.
यावर मत नाेंदविण्यासाठी समितीने नितेश सोनवणे यांना आठ वेळा संधी दिली. मात्र, ते या प्रकरणात जात पडताळणी समितीला एकदाही सामाेरे गेले नाही. याच काळात त्यांनी उपसंचालक नितीन तायडे यांच्या स्वाक्षरीचे माना जमातीचे बनावट जातवैधता प्रमाणपत्र मिळवून ते निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केले. पुढे त्यांनी त्यांचेच मृत्यू प्रमाणपत्र समितीकडे सादर केले.
या प्रकरणाची ऑर्गनायझेशन फाॅर राईटस् ऑफ ट्रायबल संघटनेने समितीकडे तक्रार केल्याने समितीने २६ जुलै २०२१ रोजी सुनावणी केली. यावेळी नितेश सोनवणे यांच्यासह नायब तहसीलदार मनोज वाडे, ग्रामसेवक ज्ञानेश्वर नेहारे, सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य तुमडाम यांच्या साक्ष नाेंदविण्यात आल्या. या प्रकरणात नितेश साेनवणे यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदविण्याची मागणीही सुनावणीदरम्यान करण्यात आली.
...
स्वत:च्या मृत्यूचे प्रमाणपत्र मिळविले
सरपंचपदी कार्यरत असताना नितेश साेनवणे यांनी त्यांच्या नातेवाईकाच्या माध्यमातून ६ एप्रिल २०२० रोजी नागपूर महानगर पालिकेत नोंदणी करून त्यांचा मृत्यूचे प्रमाणपत्र मिळविले. त्यावर त्यांच्या मृत्यूची तारीख ५ एप्रिल २०२१ नमूद केली आहे. पुढे ते मृत्यू प्रमाणपत्र जात पडताळणी समितीकडे सादर करण्यात आले. प्रकरण नस्तीबद्ध करण्यासाठी हा खटाटाेप करण्यात आला.
...
पैसे दिल्याचे बयाणात नमूद
नायब तहसीलदार मनोज वाडे यांनी नितेश सोनवने यांनी सादर केलेेेेले माना जातवैधता प्रमाणपत्र समितीकडे सादर केले. ग्रामसेवक ज्ञानेश्वर नेहारे यांनी त्यांच्या लेखी बयाणात बनावट जात प्रमाणपत्र बनवून देणाऱ्या प्रकाश नत्थू लोणकर व प्रमोद देवराव मसराम यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यांना २० हजार रुपये देऊन माना जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त केले नमूद केले आहे. जिल्ह्यात बनावट जात वैधता प्रमाणपत्र तयार करणारे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय या समितीने व्यक्त केला.