कॅशलेश व्यवहार आर्थिक प्रगतीचा टप्पा

By Admin | Updated: January 15, 2017 02:15 IST2017-01-15T02:15:13+5:302017-01-15T02:15:13+5:30

कॅशलेश’ व्यवहार हा आर्थिक प्रगतीचा टप्पा आहे. यामुळे प्रत्येकाने कॅशलेस व्यवहार करावा,

Cash Flow Transactions Economic Progress | कॅशलेश व्यवहार आर्थिक प्रगतीचा टप्पा

कॅशलेश व्यवहार आर्थिक प्रगतीचा टप्पा

अपूर्व मिश्रा : कॅशलेस व्यवहाराबाबत मार्गदर्शन कार्यशाळा
नागपूर : ‘कॅशलेश’ व्यवहार हा आर्थिक प्रगतीचा टप्पा आहे. यामुळे प्रत्येकाने कॅशलेस व्यवहार करावा, असे आवाहन एस बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक अपूर्व मिश्रा यांनी केले. वरिष्ठ कोषागार कार्यालय व एस बँक यांच्या संयुक्त विद्यामाने बचत भवन येथे आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्यशाळेत बोलत होते.
यावेळी सहसंचालक विजय कोल्हे, वरिष्ठ कोषागार अधिकारी मोना ठाकूर, अप्पर कोषागार अधिकारी दीपाली राऊत, उपकोषागार किशोर कोढे, लेखाधिकारी शैलेश कोठे, सायबर क्राईम शाखेचे पोलीस निरीक्षक उमाकांत एस. अदके, बँक उपप्रबंधक समीर कुळकर्णी, आदित्य व्यास आदी उपस्थित होते. अपूर्व मिश्रा मार्गदर्शन करताना म्हणाले की, कॅशलेश व्यवहार बँक कार्ड, प्रिपेड कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डने करू शकता. तसेच आधार कार्ड नंबर व बँक खाते नंबर बँकेशी लिंक केल्यास लाभार्थ्यांना सबसिडी सहज मिळू शकते. विविध वॉलेट्सच्या माध्यमातून आॅनलाईन खरेदी करता येते. सर्व कॅशलेस व्यवहार करताना बँकेकडे आपला मोबाईल नंबर अचूक असणे गरजेचे आहे. प्रिपेड कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचा पिन कोड नंबर कुणालाही देऊ नये तसेच डेबिट व क्रेडिट कार्डचा २५ हजार रुपयांपर्यंतचा विमाही काढता येतो. तो प्रत्येकाने काढावा, असे आवाहन त्यांनी केले. ही संपूर्ण माहिती स्लाईड शोच्या माध्यमातून देण्यात आली.
सायबर क्राईम शाखेचे पोलीस निरीक्षक उमाकांत अदके म्हणाले की, कॅशलेस व्यवहार हा सर्वसामान्य नागरिकांकरिता सुलभ आहे. परंतु व्यवहार करताना दक्षता घेणे गरजेचे आहे. आपल्या प्रिपेड, डेबिट आणि क्रेडिट कार्डचा उपयोग व्यवहार करण्याकरिता दुसऱ्याला करू देऊ नये. कुणाच्याही आमिषाला बळी पडू नये, एटीएममधून पैसे काढताना दक्षता बाळगा व मोबाईलमध्ये आॅनलाईन शॉपिंग करण्याकरिता डाऊनलोड केलेल्या ‘अ‍ॅप’विषयी खात्री करून घ्या, असे ते म्हणाले.
कार्यशाळेचे संचालनव आभार प्रदर्शन एस. एस. चहांदे यांनी केले. यशस्वितेकरिता संजय बुलबुले, नीलेश बोनगिरवार, प्रियंका पाठे, प्रणय भोगे, जितेंद्र ठाकूर व कोषागार व एस बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)

 

Web Title: Cash Flow Transactions Economic Progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.