शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या जयेशविरोधात ‘युएपीए’अंतर्गत गुन्हा

By योगेश पांडे | Updated: April 13, 2023 17:52 IST

‘पीएफए’, ‘लश्कर-ए-तोएबा’तील सदस्यांच्या होता संपर्कात : इतरही मोठे नेते होते ‘टार्गेट’

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात खंडणीसाठी दोनदा धमकी देणारा आरोपी जयेश पुजारीचे देशविरोधी संघटनांच्या सदस्यांशी संबंध असल्याची बाब समोर आली आहे. नागपूर पोलीस व केंद्रीय तपासयंत्रणांनी ही बाब गंभीरतेने घेतली असून त्याच्याविरोधात ‘युएपीए’अंतर्गत (अनलॉफुल प्रिव्हेंशन ॲक्टिव्हिटी ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयेश हा ‘पीएफए’ तसेच ‘लश्कर-ए-तोएबा’च्या सदस्यांच्या संपर्कात होता.

जयेशने नितीन गडकरी यांच्या कार्यालयात दोनदा फोन करून खंडणी मागितली. बेळगाव तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्याने हे फोन केले होते. या प्रकरणात त्याला बेळगाव तुरुंगातून ताब्यात घेण्यात आले. नागपूर पोलिसांसह केंद्रीय तपासयंत्रणांनीदेखील त्याची चौकशी केली. यातून त्याचे ‘पीएफए’ व ‘लश्कर-ए-तोएबा’च्या सदस्यांशी संपर्क असल्याची बाब समोर आली.

तो १० वर्षांपासून तुरुंगात बंद होता. बेळगाव व मंगळुरू येथील तुरुंगात तो या संघटनांच्या सदस्यांच्या संपर्कात आला होता. हे सदस्य देशविघातक कारवाया करत होते व जयेशदेखील त्यांच्यात सहभागी झाला. या संघटनांच्या देशाबाहेरदेखील ‘लिंक्स’ आहेत. त्यामुळे नितीन गडकरी यांना धमकीचा फोन करण्यामागे देशाच्या बाहेरील एखादी संघटना किंवा व्यक्तीचा हात आहे का याची सखोल चौकशी तपासयंत्रणांकडून सुरू आहे.

जयेशकडे देशातील मोठ्या नेत्यांचे क्रमांक

पोलिसांनी २० दिवसांअगोदर जयेशचा ताबा घेतला. त्याचे सीमकार्डदेखील जप्त करण्यात आले. त्यात नितीन गडकरी यांच्यासोबतच देशातील काही मोठ्या नेत्यांचे क्रमांक आढळले. तेदेखील त्याच्या ‘टार्गेट’वर होते का याची चौकशी तपासयंत्रणांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचे देशाच्या बाहेर लिंक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती केंद्रीय तपासयंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर