शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

टीबी वॉर्डातील प्रकरण : सज्जा कोसळल्याची दक्षता गुन्हे नियंत्रण मंडळाकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 22:59 IST

मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरातील त्वचा रोग विभागातील मुख्य प्रवेशद्वारावरील सज्जा कोसळल्याने गुरुवारी दोन जणांचा मृत्यू झाला. याची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने ‘दक्षता गुन्हे नियंत्रण मंडळ’कडून चौकशी करण्यात आली.

ठळक मुद्देचौकशीचा अहवाल सादर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरातील त्वचा रोग विभागातील मुख्य प्रवेशद्वारावरील सज्जा कोसळल्याने गुरुवारी दोन जणांचा मृत्यू झाला. याची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने ‘दक्षता गुन्हे नियंत्रण मंडळ’कडून चौकशी करण्यात आली. दोन सदस्यांनी केलेल्या या चौकशीचा अहवाल मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांच्याकडे सोपविल्याची माहिती आहे. तर, या घटनेला घेऊन इमामवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अंतर्गत येणाऱ्या इमारतीच्या देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम (वैद्यकीय) विभागाची आहे. नियमानुसार, दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षकांच्यास्तरावर त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या इमारतीची तपासणी करणे, आणि दर पाच वर्षांनी कार्यकारी अभियंतांनी त्या इमारतीची तपासणी करून तसा अहवाल सादर करणे आवश्यक असते. घटना घडलेल्या त्वचा रोग विभागाच्या इमारतीची तशी तपासणी करण्यात आली होती का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेला गंभीरतेने घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ‘दक्षता गुन्हे नियंत्रण मंडळ’कडून दोन सदस्यांनी शुक्रवारी त्वचा रोग विभागाच्या इमारतीला भेट दिली. त्यांनी घटनास्थळपासून इमारतीच्या इतरही भागाची पाहणी केली. सायंकाळी त्यांनी मुख्य अभियंता देबडवार यांना आपला अहवालही सादर केल्याचेही समजते. यामुळे या घटनेचा ठपका कुणावर ठेवला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.अकस्मात मृत्यूची नोंदत्वचा रोग विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईक वनिता सुधाकर वाघमारे (३६) व देवनाथ रामचंद्र बागडे (६६) यांच्या अंगावर प्रवेशद्वारावरील सज्जा पडून मृत्यू झालेल्या प्रकरणात इमामवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अद्यापही कुणावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.बागडे यांच्या कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदतत्वचा रोग विभागात उपचार घेत असलेले मृत देवनाथ बागडे यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी मेडिकलमध्ये जाऊन अधिष्ठात्यांची भेट घेतली. त्यांनी आर्थिक भरपाईची मागणीचे पत्र दिले. मेडिकल प्रशासनाने हे पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केल्याची माहिती आहे.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाnagpurनागपूरhospitalहॉस्पिटल