शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलच! ४० रुपये लुटण्याचे प्रकरण चक्क ४२ वर्षे लांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 13:53 IST

एका व्यक्तीला जखमी करून त्याच्याकडून ४० रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने एका संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. संबंधित प्रकरण तब्बल ४२ वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित होतं.

ठळक मुद्देतीन आरोपींचा मृत्यू : वाचलेल्या आरोपीची निर्दोष सुटका

नागपूर : ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. चाकू भोसकून ४० रुपये लुटण्याचे एक प्रकरण विविध कारणामुळे तब्बल ४२ वर्षे लांबले. दरम्यान, चारपैकी तीन आरोपी व सातपैकी चार सरकारी साक्षीदारांचा मृत्यू झाला. हे प्रकरण काही दिवसांपूर्वी निकाली निघाले असून वाचलेल्या आरोपीला ठोस पुरावे नसल्यामुळे निर्दोष सोडण्यात आले आहे.

भीमराव राजाराम नितनवरे असे वाचलेल्या आरोपीचे नाव आहे. तो आता ६५ वर्षे वयाचा आहे. तो आतापर्यंत जामिनावर बाहेर होता. इतर आरोपींमध्ये रमेश मेश्राम, मधुकर पाटील व हिरामण ढोके यांचा समावेश होता. ही घटना १३ जानेवारी १९७८ रोजी हिंगणा रोडवर घडली होती. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी सर्वप्रथम आरोपी रमेश मेश्रामला अटक करण्यात यश मिळविले, पण इतर आरोपी फरार होते. दरम्यान, पोलिसांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. काही वर्षांनंतर फरार आरोपी मधुकर पाटील व हिरामण ढोकेचा मृत्यू झाल्याचे कळले.

पुढे भीमराव नितनवरे पोलिसांना सापडला. त्यानंतर आरोपी रमेश मरण पावला. अशा विविध कारणांनी हे प्रकरण लांबत गेले. दरम्यान, प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने नितनवरेविरुद्ध खटला चालविण्यासाठी हे प्रकरण सत्र न्यायालयाकडे वर्ग केले होते. सत्र न्यायालयाने अडीच वर्षांमध्ये हा खटला निकाली काढला. आरोपीच्या वतीने ॲड. अमित बंड यांनी कामकाज पाहिले.

अशी घडली घटना

फिर्यादी मोतीराम गेडाम घटनेच्या दिवसी रात्री १२ च्या सुमारास घरी जात असताना आरोपींनी त्याला अडवले, तसेच त्याला चाकूने जखमी करून त्याच्याकडील ४० रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर आरोपी पळून गेले, अशी पोलीस तक्रार होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरी