शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

उद्योगातील कामगार प्रदूषणाच्या विळख्यात

By admin | Updated: June 5, 2015 02:38 IST

विकासाच्या नावावर राज्यात उद्योग येणे ही जमेची व समाधानाची बाब असली तरी प्रदूषण पसरविणाऱ्या उद्योगांची संख्या मात्र ६० टक्क्यांवर पोहोचली आहे.

प्रदूषण करणाऱ्या उद्योगाच्या संख्येत वाढ : नियंत्रक मंडळाद्वारे कुठलीही ठोस कारवाई नाहीमंगेश व्यवहारे नागपूर विकासाच्या नावावर राज्यात उद्योग येणे ही जमेची व समाधानाची बाब असली तरी प्रदूषण पसरविणाऱ्या उद्योगांची संख्या मात्र ६० टक्क्यांवर पोहोचली आहे. या प्रदूषण पसरविणाऱ्या उद्योगात विदभार्तील नऊ टक्के कामगार काम करीत असल्याचे वास्तव एका अहवालातून समोर आले आहे. सरकार उद्योगांसाठी देत असलेल्या सवलतीमुळे राज्यातील उद्योगांचा आलेख चढता आहे. मात्र, यातील ६० टक्के उद्योगातून टाकाऊ विषारी वायू ,अ‍ॅसिडसदृश द्रवपदार्थ बाहेर टाकले जात असून ते मानवजातीसाठी हानीकारक आहे. यासंदर्भात अनेकदा प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित उद्योगांना नोटीस पाठविल्या. मात्र, उद्योगांच्या संचालक मंडळाने त्या नोटीसलाच वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. सद्यस्थितीत प्रदूषण निर्माण करणाऱ्या धोकादायक उद्योगांमध्ये सुमारे ५० टक्के कामगार काम करीत आहेत. यातील नऊ टक्के कामगार हे विदभार्तील आहेत.साखरनिर्मिती आणि शुद्धीकरण हायड्रोजनेटेड तेल, वनस्पती तूप व खाद्यतेल, स्पिरिटचे शुद्धीकरण कागद आणि कागदी बोर्डनिर्मिती कातडी उद्योग, पेट्रोलियम आणि कोळसा, औषधी आणि रासायनिक उत्पादने, सिमेंट, धातू उद्योग आणि औष्णिक वीजप्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात विषारी वायूचे उत्सर्जन होते. या उद्योगांमधून निर्माण होणाऱ्या टाकाऊ पदार्थांकडे बघण्याचा सापत्न दृष्टिकोन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उदासीनतेमुळे या उद्योगांचे चांगलेच फावत आहे. हानीकारक टाकाऊ पदार्थ निर्माण करणाऱ्या उद्योगांचे प्रमाण आज ६० टक्क्यांवर पोहोचले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ही प्रदूषणासंदभार्तील कायद्याची अंमलबजावणी करणारी प्रमुख यंत्रणा आहे. मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या अखत्यारीतील ७७ हजार ७४६ कारखान्यांपैकी जलप्रदूषण करणारे २७ टक्के, वायुप्रदूषण करणारे २६ टक्के तर धोकादायक टाकाऊ पदार्थ बाहेर फेकणाऱ्या कारखान्यांचे प्रमाण ७ टक्के आहे. प्रदूषणात भर टाकणाऱ्या कारखान्यांची संख्या अवघ्या पाच वर्षात दुपटीने वाढली आहे. प्रदूषणामुळे होणारे आजारशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. समीर गोलावार यांनी विविध उद्योगात काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्यावर अभ्यास केला आहे. त्यांच्या अभ्यासात उद्योगानुसार कामगारांमध्ये आजार आढळले आहे. स्टोन क्रशिंगमध्ये काम करणाऱ्या कामगारांना श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात होता. केमिकल कंपनीत काम करणाऱ्यांना कर्करोगाचा धोका असतो. धातू उद्योगातील कामगारांना रक्तपेशीचे आजार, कॉटनमध्ये श्वसनाचे आजार, साखर कारखान्यात डायगासोसीस आदी आजार मोठ्या प्रमाणात कामगारांना झाल्याचे निदर्शनास आले आहे.