बनवाडी गावातील प्रकरण : अवैध उत्खनन करणाऱ्यांवर ठोठावला ३.७७ कोटीचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 09:05 PM2020-06-19T21:05:37+5:302020-06-19T21:07:19+5:30

बनवाडी गावातील परिसरात करण्यात येत असलेल्या अवैध उत्खनन प्रकरणात अखेर प्रशासनाने कठोर भूमिका घेत ३ कोटी ७७ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणात तहसीलदारमार्फत संबंधित शेतजमिनीच्या मालकांच्या नावावर नोटीस पाठवण्यात आली आहे.

Case in Banwadi village: Illegal excavators fined Rs 3.77 crore | बनवाडी गावातील प्रकरण : अवैध उत्खनन करणाऱ्यांवर ठोठावला ३.७७ कोटीचा दंड

बनवाडी गावातील प्रकरण : अवैध उत्खनन करणाऱ्यांवर ठोठावला ३.७७ कोटीचा दंड

Next
ठळक मुद्देतहसीलदारांनी पाठविली नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनवाडी गावातील परिसरात करण्यात येत असलेल्या अवैध उत्खनन प्रकरणात अखेर प्रशासनाने कठोर भूमिका घेत ३ कोटी ७७ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणात तहसीलदारमार्फत संबंधित शेतजमिनीच्या मालकांच्या नावावर नोटीस पाठवण्यात आली आहे. लोकमतने सर्वप्रथम ४ जून रोजी हे प्रकरण उघडकीस आणले. त्यानंतर जिल्हा प्रशासन व तहसील प्रशासनाने कारवाई केली.
बनवाडी गावाजवळ पोकलॅण्ड आणि जेसीबी मशीनच्या मदतीने पहाड खोदून जमीन समतल करण्यात येत होती. भूमाफियांच्या इशाऱ्यावर दिवसाढवळ्या सुरू असलेले हे अवैध उत्खनन प्रशासनाच्या नजरेस पडले नाही. अखेर लोकमतने याबाबत वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. यासंबंधात वृत्त प्रकाशित होताच जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात जिल्हा खनिकर्म अधिकाºयांना जबाब मागितला. तसेच नागपूर ग्रामीणच्या तहसीलदारासह स्पॉट पंचनामा करण्याचे आदेश दिले. यानंतर लोकमतने याचा पाठपुरावा सुरूच ठेवला. तहसील प्रशासनाकडून अशीही माहिती मिळाली की, बनवाडी गावातील ज्या तीन-चार शेत मालकांना नोटीस जारी करण्यात आली आहे, त्यांच्याच जमिनीवर अवैध खनन करण्यात आले आहे. यातील एका शेतजमिनीचा मालक मुंंबईत राहतो. त्याच्या जमिनीवर सर्वाधिक खनन झाल्याची माहिती आहे. प्रशासनाने पाठवलेल्या या नोटीसवर या सर्व मालकांच्या उत्तराची प्रशासनाला प्रतीक्षा आहे. त्यांचे म्हणणे आहे की, उत्तर आल्यावरच पुढील कारवाई निश्चित केली जाईल. तहसील प्रशासनानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या सीमांकनाच्या प्रक्रियेला हिरवी झेंडी दाखवली आहे ती भूमी अभिलेख कार्यालयाचे पथक आल्यानंतर सुरू केली जाईल.

सर्व्हेयर पोहोचले
जिल्हाधिकाऱ्यांनी सीमांकनाची प्रक्रिया सुरूकरण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा स्तरावरील एक सर्व्हेयर पाठवण्यात आले आहे. परंतु तहसील प्रशासनाचे म्हणणे आहे की, पत्र दिल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाकडून या प्रक्रियेसाठी अजूनपर्यंत कुणालाही काही पाठवण्यात आलेले नाही. त्यामुळे सीमांकनाची कारवाई अजूनही सुरू होऊ शकलेली नाही.

दंड न भरल्यास कारवाई होणार
तहसीलदारांनी लोकमतला सांगितले की, या प्रकरणात पटवारीतर्फे करण्यात आलेल्या पंचनामा रिपोर्टच्या आधारावर तीन ते चार शेतमालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना तहसील प्रशासनाने नोटीस जारी केली आहे. ३ कोटी ७७ लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. जर संबंधित लोकांनी या दंडाची रक्कम भरली नाही तर प्रशासन कठोर पाऊल उचलत त्यांची जमीन सरकारकडे जमा करू शकते.

दंडाचा आदेश जारी झाला आहे
बनवाडी गाव परिसरात करण्यात आलेल्या अवैध खनन प्रकरणात पटवारीने दिलेल्या रिपोर्टच्या आधारावर तीन ते चार लोकांविरुद्ध ३.७७ कोटी रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाचा आदेश जारी झालेला आहे. जर ही रक्कम भरण्यास संबंधितांनी दुर्लक्ष केले तर त्यांच्याविरुद्ध आवश्यक कारवाई केली जाईल.
मोहन टिकले, तहसीलदार, नागपूर ग्रामीण

Web Title: Case in Banwadi village: Illegal excavators fined Rs 3.77 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.