शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

अंगणवाडी सेविकेच्या मदतीला ‘कॅस’ : प्रत्येक अंगणवाडी ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 10:30 PM

पोषण अभियानाला गती देण्यासाठी शासनाने कॉमन अप्लिकेशन सॉफ्टवेअर (कॅस)ची निर्मिती केली आहे; सोबतच सर्व सेविकांना स्मार्ट फोन उपलब्ध करून दिला आहे.

ठळक मुद्दे१० रजिस्टरसाठी आता १ अप्लिकेशन सॉफ्टवेअर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी राज्यात अंगणवाड्या कार्यरत आहेत. अंगणवाडीच्या माध्यमातून सरकारने ‘पोषण अभियान’ राबविले आहे. या पोषण अभियानाला गती देण्यासाठी शासनाने कॉमन अप्लिकेशन सॉफ्टवेअर (कॅस)ची निर्मिती केली आहे; सोबतच सर्व सेविकांना स्मार्ट फोन उपलब्ध करून दिला आहे. या अप्लिकेशनद्वारे अंगणवाडी केंद्रातील नियमित माहिती दैनंदिन पद्धतीने भरायची आहे. अंगणवाडी केंद्रात आतापर्यंत माहिती संकलनासाठी १० रजिस्टर भरावे लागत होते. आता हे काम एका अप्लिकेशनद्वारे होणार आहे.केंद्र सरकारने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत ‘कॅस’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अंगणवाडी केंद्रामध्ये ठेवण्यात येणारे स्टॉक रजिस्टरबरोबरच इतर १० रजिस्टर बंद करण्यात यावे, असे निर्देश दिले आहे. ‘कॅस’ संदर्भातील प्रशिक्षण अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका व मुख्य सेविकांचे पूर्ण झाले आहे. शासनाच्या डॅश बोर्डवर अंगणवाडी सेविका सॉफ्टवेअरचा वापर करीत असल्याचे दिसून आले आहे. यासाठी अंगणवाडीसेविकांना स्मार्ट फोन डाटा प्लॅनसह दिला आहे.पोषण अभियानांतर्गत पुढील तीन वर्षांत निश्चित उद्दिष्टे साध्य करावयाची आहेत. त्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांतील खुजे/बुटकेपणाचे प्रमाण कमी करणे, बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, बालकांतील रक्तक्षय, जन्मत: कमी वजनाचे असणाऱ्या बालकांचे प्रमाण कमी करणे. तसेच किशोरवयीन मुली व महिलांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करणे. सोबतच बाळाच्या जन्मानंतरचे पहिले एक हजार दिवस यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत पुढील तीन वर्षांत अंगणवाडी केंद्र इमारतीचे बळकटीकरण करणे, लसीकरण, आरोग्य-शिक्षण आदींचा समावेश आहे. या सर्व कामकाजाची माहिती, संचालनाची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर आहे. त्याचबरोबर अंगणवाडीतील दैनंदिन कामकाजासाठी वेगवेगळे १० रजिस्टर नियमित भरावे लागत असल्याने ‘कॅस’द्वारे हे काम सहजतेने होईल, अशी अपेक्षा आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधनही ‘कॅस’द्वारेअंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन ‘पीएफएमएस’ प्रणालीद्वारे अदा करण्यात येते. मानधन अदा करीत असताना ‘कॉमन अप्लिकेशन सॉफ्टवेअर’द्वारे अंगणवाडीत सेविकेच्या उपस्थितीचे दिवस, अंगणवाडी किती दिवस उघडण्यात आली, याची माहिती प्राप्त होईल. त्याद्वारे मानधन अदा करण्याची कारवाई करता येईल.

टॅग्स :onlineऑनलाइनwomen and child developmentमहिला आणि बालविकास