६० ज्येष्ठ नागरिकांचे काेराेना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:12 IST2021-03-04T04:12:23+5:302021-03-04T04:12:23+5:30
रामटेक : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात काेराेना लसीकरणाची साेय करण्यात आली असून, ज्यांनी काेविन ॲपवर नावाची नाेंदणी केली आहे, त्यातीत ...

६० ज्येष्ठ नागरिकांचे काेराेना लसीकरण
रामटेक : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात काेराेना लसीकरणाची साेय करण्यात आली असून, ज्यांनी काेविन ॲपवर नावाची नाेंदणी केली आहे, त्यातीत ६० ज्येष्ठ नागरिकांना मंगळवारी काेराेनाची लस टाेचण्यात आली. हे अभियान साेमवार(दि. १)पासून सुरू करण्यात आले असून, एकूण ७९ नागरिकांना ही लस देण्यात आली. यात पहिल्या दिवशी लस घेणाऱ्या १९ नागरिकांचा समावेश आहे.
ही लस घेण्यासाठी आराेग्य विभागाच्या काेविन ॲपवर आधी नाेंदणी करणे आवश्यक आहे. रामटेक शहरातील काही नागरिकांनी या ॲपवर स्वयंस्फूर्तीने नाेंदणी केली आहे. यातील ६० जणांचे मंगळवारी लसीकरण करण्यात आले. यात ६० वर्षांवरील ५० आणि ४५ ते ६० वर्षे वयाेगटातील १० नागरिकांचा समावेश आहे. हे १० नागरिक विविध आजारांचे रुग्ण आहेत. रामटेक शहरात काेराेना लसीकरण माेहीम उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. प्रकाश उजगरे यांच्या मार्गदर्शनात राबविली जात असून, नितीन मेश्राम व कर्मचारी सहकार्य करीत आहेत.