चिमुकल्याचा करुण अंत

By Admin | Updated: April 19, 2016 06:26 IST2016-04-19T06:26:19+5:302016-04-19T06:26:19+5:30

खेळता खेळता विहिरीत पडल्यामुळे १६ महिन्याच्या चिमुकल्याचा करुण अंत झाला. रविवारी सायंकाळी प्रतापनगर

Caring End of Mom | चिमुकल्याचा करुण अंत

चिमुकल्याचा करुण अंत

नागपूर : खेळता खेळता विहिरीत पडल्यामुळे १६ महिन्याच्या चिमुकल्याचा करुण अंत झाला. रविवारी सायंकाळी प्रतापनगर तिसरा बसथांबा (गोपालनगर) जवळ ही घटना घडली. भावेश नरेश राजनकर (वय १६ महिने) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. नरेश माणिकराव राजनकर (वय २५) हे लोकसेवा नगरात राहतात. ते एका केस कर्तनालयात काम करतात.
घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांची पत्नी धुणी भांड्याचे काम करते. अशा वेळी घरी चिमुकल्या भावेशला कुणी सांभाळायला नसल्याने नरेश राजनकर त्याला आपल्या सोबत घेऊन केस कर्तनालयात जात होते.
नेहमीप्रमाणे रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास राजनकर भावेशला खेळवत असताना दुकानात एक ग्राहक आले. त्यामुळे त्यांनी भावेशला खाली खेळायला सोडले. ते ग्राहकाचे केस कापत असताना चिमुकला भावेश खेळता खेळता बाजूला असलेल्या वानखेडेच्या विहिरीजवळ गेला आणि विहिरीत पडला. ग्राहकाचे काम संपल्यानंतर राजनकर भावेशला शोधू लागले.
१५ ते २० मिनिटे इकडे तिकडे शोधल्यानंतर त्यांनी विहिरीत बघितले तेव्हा विहिरीत भावेश पडून दिसला. त्यांनी प्रतापनगर पोलिसांना कळविले. उपनिरीक्षक के. आर. घोडवे यांनी लगेच अग्निशमन दलाला पाचारण केले. भावेशला बाहेर काढून मेडिकलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी चिमुकल्या भावेशला मृत घोषित केले. या घटनेमुळे राजनकर दाम्पत्याला जबर मानसिक धक्का बसला असून परिसरातही तीव्र शोककळा पसरली आहे.(प्रतिनिधी)

राजनकर दाम्पत्याचे विश्वच हरवले
राजनकर दाम्पत्याने प्रेमविवाह केला होता. त्यामुळे दोघांच्याही नातेवाईकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. परिणामी सर्व नातेवाईक असूनही राजनकर दाम्पत्य कौटुंबिक सुखापासून दुरावले होते. १६ महिन्यांपूर्वी भावेशचा जन्म झाल्यापासून राजनकर दाम्पत्याच्या जीवनातील एकाकीपणा दूर झाला होता. भावेशच त्यांच्यासाठी सर्वकाही होता. त्यामुळे हे दोघेही त्याला आलटून-पालटून सोबतच ठेवत होते. रविवारी पत्नी कामावर गेल्यामुळे नरेश राजनकरने भावेशला दुकानात आणले. पाच-दहा मिनिटात ग्राहकाचे काम आटोपेल आणि भावेशला पुन्हा जवळ घेईल, अशा बेताने राजनकरने त्याला खाली सोडले होते. अशी भयंकर घटना घडेल, असा विचार स्वप्नातही राजनकर दाम्पत्याने केला नव्हता. या घटनेने राजनकर दाम्पत्याचे विश्वच हरवले आहे.

Web Title: Caring End of Mom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.