काेराेना लसीकरण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:08 IST2021-03-23T04:08:42+5:302021-03-23T04:08:42+5:30
कामठी : स्थानिक उपजिल्हा रुग्णालय आणि तालुका आराेग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने कामठी शहरातील वाॅर्ड क्रमांक - १० मध्ये साेमवारी ...

काेराेना लसीकरण शिबिर
कामठी : स्थानिक उपजिल्हा रुग्णालय आणि तालुका आराेग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने कामठी शहरातील वाॅर्ड क्रमांक - १० मध्ये साेमवारी (दि. २२) काेराेना लसीकरण शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
या शिबिराच्या आयाेजनाबाबत वाॅर्ड क्रमांक - १० मधील नागरिकांना घराेघरी जाऊन माहिती देण्यात आली हाेती. शिवाय, ६० वर्षांवरील नागरिकांना शिबिरस्थळी आणण्यासाठी वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली हाेती. या शिबिरात स्थानिक व घाेरपड (ता. कामठी) येथील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार अरविंद हिंगे, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. संजय माने, नगरसेवक काशीनाथ प्रधान उपस्थित हाेते. ज्यांनी लस घेतली नाही, त्यांनी लसीकरण करवून घ्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.