खापा येथे काेराेना लसीकरणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:14 IST2021-03-13T04:14:04+5:302021-03-13T04:14:04+5:30
खापा : शहरातील प्राथमिक आराेग्य केंद्रात काेराेना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. ६० वर्षांवरील तसेच ४५ ते ५९ वर्षे ...

खापा येथे काेराेना लसीकरणाला सुरुवात
खापा : शहरातील प्राथमिक आराेग्य केंद्रात काेराेना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. ६० वर्षांवरील तसेच ४५ ते ५९ वर्षे वयाेगटातील नागरिकांना ही लस माेफत देण्यात येणार असून, राेज २५० नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक आराेग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत तेलसे यांनी दिली.
काेराेना लस घेण्यासाठी नागरिक प्राथमिक आराेग्य केंद्रात गर्दी करीत असल्याचेही तसेच या ठिकाणी काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करीत असल्याचेही प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. लसीकरणासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्रास हाेऊ नये म्हणून या आराेग्य केंद्रात त्यांच्यासाठी बसण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र साेय करण्यात आली आहे. शहरात शुक्रवारपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आल्याने नगराध्यक्ष प्रियंका माेहटे, पालिकेच्या मुख्याधिकारी उाॅ. ऋचा धाबर्डे, उपाध्यक्ष मुकेश गायधनी, आराेग्य अधिकारी आरोग्य अधिकारी वर्षा शंकरवार, राजेश्वर महाजन, गजेंद्र मेश्राम ॲन्थोनी पाल, प्रफुल्ल मोहटे, अमोल सोनसरे, प्रमोद लखडकर, सागर पहाडे, अनिल कोंडे, सुनील चव्हाण, हरीश कोल्हे यांनी आराेग्य केंद्राची पाहणी करून लसीकरणाचा आढावा घेतला.