वाडीत १६५५ जणांची काेराेना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:12 IST2021-03-04T04:12:16+5:302021-03-04T04:12:16+5:30
वाडी : नगर परिषद आणि ग्रामीण भागात आता पुन्हा काेविड चाचणी केंद्र सुरू झाले आहे. व्याहाड पेठ प्राथमिक आराेग्य ...

वाडीत १६५५ जणांची काेराेना चाचणी
वाडी : नगर परिषद आणि ग्रामीण भागात आता पुन्हा काेविड चाचणी केंद्र सुरू झाले आहे. व्याहाड पेठ प्राथमिक आराेग्य केंद्राची चमू वाडीतील जिल्हा परिषद शाळेत आपली जबाबदारी स्वीकारून आपल्या कर्तव्याचे पालन करीत आहे. या तपासणी माेहिमेंतर्गत १६५५ नागरिकांची आरटी-पीसीआर चाचणी पूर्ण झाली आहे.
जिल्हा प्रशासन व वाडीचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या मार्गदर्शनात व्याहाड पेठ आराेग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुषमा धुर्वे यांच्या नेतृत्वात प्रतीक्षा भैसारे, दीक्षा मेश्राम, शीतल पख्खिडे, वाडी न.प.चे आराेग्य निरीक्षक धनंजय गाेतमारे यांची चमू दरराेज नागरिकांच्या स्वॅबचे संकलन करीत आहेत. १३ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या तपासणी मोहिमेत आतापर्यंत १६५५ नागरिकांची आरटी-पीसीआर चाचणी तर २९४ नागरिकांची ॲन्टिजेन चाचणी पूर्ण करण्यात आली आहे. यात आतापर्यंत ५७ नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांना गृहविलगीकरण करून उपचार देण्यात येत आहेत.
वाडी व ग्रामीण भागातील शिक्षक, कर्मचारी, सुराबर्डी येथील पाेलीस प्रशिक्षण केंद्रातील १९६ जवानांची तपासणी करण्यात आली. यामध्ये चार पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच छोट्या व्यावसायिकांचीही तपासणी करण्यात आली आहे. सध्या वाडीत कोरोना रुग्णांना उपचार करण्याचे केंद्र नाही. डॉ. सुषमा धुर्वे यांनी सांगितले की, रुग्णांना त्यांच्या घरीच सुरक्षित करून उपचार दिले जातील. ज्यांच्या घरी वेगळे राहण्याची सुविधा नाही, अशांना वानाडोंगरी येथील उपचार केंद्र किंवा मेयो रुग्णालयात दाखल केले जाईल. काेराेनाला नियंत्रित करण्यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययाेजना व शासनाच्या नियमावलीचे पालन करावे तसेच मास्कचा वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून स्वत:ला सुरक्षित ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.