काेराेना फ्रन्ट लाईन वर्करचा गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:06 IST2021-07-12T04:06:57+5:302021-07-12T04:06:57+5:30

कामठी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयाेजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात बाजार समिती प्रशासनाच्यावतीने काेराेना फ्रन्ट लाईन ...

Carina front line worker's absence | काेराेना फ्रन्ट लाईन वर्करचा गाैरव

काेराेना फ्रन्ट लाईन वर्करचा गाैरव

कामठी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयाेजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात बाजार समिती प्रशासनाच्यावतीने काेराेना फ्रन्ट लाईन वर्करचा गाैरव करण्यात आला.

अध्यक्षस्थानी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती नियमन समिती तथा कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकूमचंद आमधरे हाेते तर प्रमुख अतिथी म्हणून कामठीचे नगराध्यक्ष शहाजहा शफाहत अन्सारी, उपाध्यक्ष अफाज ठेकेदार, बाजार समितीचे उपसभापती प्रमोद महल्ले, डॉ. श्रद्धा भाजीपाले उपस्थित होते. यावेळी डॉक्टर, परिचारिका, महसूल, नगर परिषद व आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच आशासेविका व अंगणवाडी सेविका या फ्रन्ट लाईन वर्करचा अतिथींच्या हस्ते गाैरव करण्यात आला. काेराेना संक्रमण राेखण्यात या सर्व कर्मचाऱ्यांना माेलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन हुकूमचंद आमधरे यांनी केले. स्वामित्र नंदी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयाेजनाचा उद्देश विशद केला. विकास बोबडे यांनी संचालन केले तर बाजार समितीचे सचिव एस. नागपुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Web Title: Carina front line worker's absence