शहरं
Join us  
Trending Stories
1
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
2
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
3
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
4
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
5
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
6
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
7
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
9
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
10
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
11
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
12
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
13
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
14
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
15
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
16
मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक
17
Astro Tips: पैसे आणि समृद्धीसाठी पर्समध्ये ठेवा 'या' ५ शुभ गोष्टी; लाभेल लक्ष्मीचा वरदहस्त!
18
हवाई दलाची अधिकारी कशी झाली इराणची गुप्तहेर? मोनिका विटच्या 'ब्लॅक मिस्ट्री'चा थरारक खुलासा
19
उकाड्याने विजेची मागणी वाढली, वीज कंपन्यांवर ताण, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित!
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

मालगाडीच्या गार्डचा डबा रुळावरून घसरला!

By admin | Updated: July 13, 2017 01:17 IST

पाच दिवसांत तिसरी घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूम : मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळांतर्गत येणाऱ्या मूर्तिजापूर-बडनेरादरम्यान कुरूम रेल्वे स्टेशनवर गिट्टी वाहून नेणाऱ्या मालगाडीच्या गार्डचा डबा गिट्टी डेपोच्या भिंतीला धडकल्याने मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना १२ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता घडली.

कुरूम रेल्वे स्टेशनजवळ मालगाडी रुळावरून घसरण्याची मागील पाच दिवसांतील ही तिसरी घटना आहे, हे विशेष.
यापूर्वी ७ जुलै रोजी लुप लाइनवर जाणारी मालगाडीची वॅगन रुळावरून घसरली होती. यामुळे नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या दोन ते अडीच तास उशिराने धावल्या होत्या. त्यानंतर ११ जुलै रोजी दुपारी गिट्टी डेपोतून गिट्टी भरून बडनेराकडे जाणाऱ्या मालगाडीची वॅगन त्याच डाउन लुप लाइनवर रुळावरून घसरली होती. त्यामुळेसुद्धा नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या दोन ते अडीच तास उशिराने धावल्या होत्या. या घटनेपाठोपाठ १२ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता सदर मालगाडी गिट्टी खाली करून परत डेपोमध्ये गेली असता तेथे उभी करीत असताना अप सायडिंगच्या लाइनवर गार्डचा डबा डेपोच्या भिंतीला धडकल्याने मालगाडी रुळावरून खाली उतरली. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मेनअप व डाउन लाइन सुरळीत असल्याने गाड्यांची रहदारी सुरळीत चालू आहे. या घटनेची माहिती मिळताच बडनेरा रेल अभियंता प्रमोद वाढेकर हे त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले असून, हे वृत्त लिहीपर्यंत गार्डचा डबा रुळावर ठेवण्याचे काम सुरू होते.