सावनेर : स्थानिक शासकीय रुग्णालय परिसरात मंगळवारी काेराेना लसीकरण माेहिमेची रंगीत तालीम (ड्राय रन) करण्यात आली. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, प्रपाठक पवन मेश्राम, नियंत्रण अधिकारी डाॅ.संदीप गुजर, न. प. मुख्याधिकारी रवींद्र भेलावे, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ.प्रशांत वाघ, डाॅ.साजिद, काेविड नुडल अधिकारी डाॅ.प्रीतम निचंत आदींची उपस्थिती हाेती.
आतापर्यंत नऊ जणांवर प्रक्रिया करण्यात आली. एका तासात १० व्यक्तीला लस दिली जाते. तीन टप्प्यांत ही माेहीम राबविली जाणार असून, प्रथम आराेग्य कर्मचारी दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील वृद्ध आणि त्यानंतर इतर नागरिकांचे लसीकरण हाेईल. सुट्टीचे दिवस वगळता दरराेज सकाळी ९ वाजता लसीकरण माेहिमेला सुरुवात केली जाणार आहे. यामध्ये रुग्णाचे हात स्वच्छ करून तपासणी व्हॅक्सिन व्हॅलिड डाटानंतर लसीकरण केले जाते. त्यानंतर, निरीक्षण कक्षात अर्धा तास निरीक्षण हाेईल, नंतर २८ दिवसांनंतर पुन्हा रुग्णाला मॅसेज पाठवून दुसरा डाेज दिला जाणार आहे, अशी माहिती प्रपाठक डाॅ.पवन मेश्राम यांनी दिली. यावेळी डाॅक्टर व आराेग्य कर्मचारी उपस्थित हाेते.