शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

विलायची एक हजाराने महाग  : विक्रीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 11:48 PM

गेल्यावर्षीच्या केरळमधील पुराचा फटका यावर्षी मसाल्यांना बसला आहे. तुलनात्मकरीत्या यावर्षी मसाल्यांचे पदार्थ महागले असून १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारात दर वाढल्यामुळे किरकोळ बाजारांमध्येही मसाल्यांच्या पदार्थांचा दरवाढीचा ठसका नागरिकांना बसू लागला आहे. पण काही मसाल्यांचे भाव कमी झाले आहेत. दीड महिन्यात विलायचीचे भाव एक हजार रुपयांनी वाढले आहेत.

ठळक मुद्देमसाल्यांना महागाईचा ठसका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्यावर्षीच्या केरळमधील पुराचा फटका यावर्षी मसाल्यांना बसला आहे. तुलनात्मकरीत्या यावर्षी मसाल्यांचे पदार्थ महागले असून १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारात दर वाढल्यामुळे किरकोळ बाजारांमध्येही मसाल्यांच्या पदार्थांचा दरवाढीचा ठसका नागरिकांना बसू लागला आहे. पण काही मसाल्यांचे भाव कमी झाले आहेत. दीड महिन्यात विलायचीचे भाव एक हजार रुपयांनी वाढले आहेत.भाववाढीमुळे केवळ २० टक्के विक्रीनागपूर इतवारी किराणा असोसिएशनचे अध्यक्ष भंवरलाल जैन यांनी सांगितले की, घाऊक बाजारात विलायचीचे भाव प्रति किलो तब्बल एक हजार रुपयांनी वाढले आहेत. दीड महिन्यांपूर्वी घाऊक बाजारात ८ एमएम विलायचीचे प्रति किलो १८०० रुपयांवर असलेले दर २८०० रुपयांवर पोहोचले आहेत. भाववाढीमुळे विक्रीवर परिणाम झाला असून, सध्या बाजारात विलायचीची २० टक्के विक्री राहिली आहे.देशात विलायचीचे सर्वाधिक उत्पादन केरळ आणि तामिळनाडू राज्यात होते. या दोन्ही राज्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत पाऊस फारच कमी आला आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला असून, तोडणी कमी झाली आहे. जुलै महिन्यात होणारी तोडणी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणार आहे. यंदा मान्सून उशिरा येण्याचे संकेत असल्यामुळे उत्पादनाला फटका बसणार आहे. भाव वाढणार नाहीत, पण मंदी निश्चितच राहील, असे जैन म्हणाले.भारतीय मसाले दर्जेदार आणि सर्वोत्तम असून जगात सर्वत्र मागणी आहे. त्यामुळे भारतातून विविध प्रकारच्या मसाल्यांना प्रचंड मागणी आहे. भारतात आफ्रिकन देशातून मसाल्यांची आयात होते. पण दर्जा चांगला नसल्यामुळे बाजारात मागणी कमी आहे.घाऊक बाजारात तुलनात्मक भाव प्रति किलोमसाले    २०१८          २०१९विलायची १८००         २८००लवंग      ५८०            ६००जायपत्री १५००         १६७०मोठी विलायची ८५०   ६६०काळे मिरे       ५००     ३८०तेजपान           ६०       ७०

टॅग्स :Inflationमहागाईnagpurनागपूर