भरधाव कारची मोटरसायकलला धडक
By Admin | Updated: July 24, 2015 02:57 IST2015-07-24T02:57:33+5:302015-07-24T02:57:33+5:30
भरधाव कारने एका मोटरसायकलस्वार विद्यार्थ्याला जोरदार धडक मारून जबर जखमी केले.

भरधाव कारची मोटरसायकलला धडक
विद्यार्थी गंभीर जखमी : पोलिसांनी लपविली माहिती
नागपूर : भरधाव कारने एका मोटरसायकलस्वार विद्यार्थ्याला जोरदार धडक मारून जबर जखमी केले. गुरुवारी सकाळी भोले पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात घडला. रात्री ११.३० पर्यंत या भीषण अपघाताची माहिती देण्यासाठी सीताबर्डी पोलिसांनी टाळाटाळ केली.
या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव दिनेश हरिया सिरिया (वय २२) असून, तो कामठीच्या गुजरी चौकात राहतो. गुरुवारी सकाळी तो शिकवणी वर्गाला धरमपेठमध्ये जात होता. भोले पेट्रोल पंपाजवळ आरोपी विश्राम देवांगण (वय ५१, रा. रायपूर, छत्तीसगड) याने दिनेशला जोरदार धडक मारली. नशिब बलवत्तर म्हणून दिनेश मोटरसायकलवरून दूर पडला तर कार मोटरसायकलसह चढून दुभाजकावर चढली. या अपघातात दुचाकीची पुरती मोडतोड झाली. टेलिफोन विभागाची डीपीही तुटली अन् भिंतीलाही तडा गेला. विशेष म्हणजे, सकाळी झालेल्या या अपघाताची माहिती द्यायची नाही, असे आदेश ‘साहेबांनी‘ दिल्याचे सीताबर्डीतील पोलीस सांगत होते. साहेबांची ही लपवाछपवी कशासाठी होती, ते स्पष्ट होऊ शकले नाही. (प्रतिनिधी)