कॅप्टन खुशाल व्यास एनसीसी नागपूरचे ग्रुप कमांडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2023 20:15 IST2023-05-04T20:14:34+5:302023-05-04T20:15:37+5:30
Nagpur News ग्रुप कॅप्टन खुशाल व्यास यांनी एनसीसी ग्रुप नागपूरचे ग्रुप कमांडर म्हणून पदभार सांभाळला. त्यांनी ग्रुप कॅप्टन ब्रिजेश चाैहान यांच्याकडून पदभार स्वीकारला.

कॅप्टन खुशाल व्यास एनसीसी नागपूरचे ग्रुप कमांडर
नागपूर : ग्रुप कॅप्टन खुशाल व्यास यांनी एनसीसी ग्रुप नागपूरचे ग्रुप कमांडर म्हणून पदभार सांभाळला. त्यांनी ग्रुप कॅप्टन ब्रिजेश चाैहान यांच्याकडून पदभार स्वीकारला.
कॅप्टन व्यास हे वायुसेनेच्या परिवहन संचलनात सेवेत हाेते व विविध ट्रान्सपाेर्ट एअरक्राफ्टमध्ये ६००० तास उडान करण्याचा त्यांना अनुभव आहे. ते एअर एनसीसी इंदुरचे माजी विद्यार्थी आहेत. प्रशिक्षित फ्लाइंग इन्स्ट्रक्टर म्हणून उत्तर आणि ईशान्येकडील क्षेत्रात ऑपरेशनल आणि प्रशिक्षण अनुभवासह फॉरवर्ड एरिया ड्रॉप्स, एअर टू एअर रिफ्यूलिंग, व्हीआयपी फ्लाइंग अशा विविध भूमिका सांभाळल्या आहेत.