सिवनीच्या गांजा तस्कराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:07 IST2021-06-18T04:07:16+5:302021-06-18T04:07:16+5:30

नागपूर : पाचपावली पोलिसांनी गांजा तस्करीत लिप्त सिवनी येथील दोन युवकांना अटक केली आहे. दोघांपासून कार आणि बाईकसह २.५९ ...

Cannabis smuggler arrested | सिवनीच्या गांजा तस्कराला अटक

सिवनीच्या गांजा तस्कराला अटक

नागपूर : पाचपावली पोलिसांनी गांजा तस्करीत लिप्त सिवनी येथील दोन युवकांना अटक केली आहे. दोघांपासून कार आणि बाईकसह २.५९ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.

अनिलकुमार मोहनलाल चौकसे (३७) आणि बेनीसिंह मुन्नीलाल गज्जाम (५२) छपरा, सिवनी अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांना सिद्धार्थनगरात गस्त घालताना आरोपी संदिग्ध अवस्थेत दिसून आले. पोलिसांनी कारची तपासणी केली असता २९ हजार रुपये किमतीचा गांजा मिळाला. आरोपी बाईकने गांजा घेऊन नागपुरात आले होते. त्यांनी नागपुरात एका ओळखीच्या व्यक्तीची कार मागितली. कारमध्ये गांजा घेऊन डिलिव्हरी देण्यासाठी या ठिकाणी आले होते. त्यापूर्वीच ते पोलिसांच्या हाती लागले. आरोपी यापूर्वीही गांजाच्या विक्रीसाठी नागपुरात आले होते. ते सिवनी येथे गांजाची विक्री करतात. नागपुरातही त्यांचे ग्राहक आहेत. पोलीस आरोपींचे ग्राहक आणि अन्य लोकांचा शोध घेत आहेत. आरोपींविरुद्ध मादक पदार्थविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. ही कारवाई पीआय संजय मेंढे, पीएसआय प्रमोद खंडार, हवालदार नंदकिशोर वालदे, छगन शिंगणे, नायक सुनील ठाकूर, संजय मिश्रा, रोशन फुकट आणि संजय बरेल यांनी केली.

Web Title: Cannabis smuggler arrested