खाप्यात गांजा विक्रेत्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST2021-06-24T04:07:57+5:302021-06-24T04:07:57+5:30
सावनेर : खापा शहरात गांजा विक्री करणाऱ्या ईश्वर गणपती पराते याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. खापा पोलीस ठाण्याच्या ...

खाप्यात गांजा विक्रेत्यास अटक
सावनेर : खापा शहरात गांजा विक्री करणाऱ्या ईश्वर गणपती पराते याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करताना खापा शहरात एक व्यक्ती गांजाची विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाला होती. त्यानुसार त्याच्या घरी धाड टाकून आरोपीस ६५ हजार ६८० रुपयाच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली.
ईश्वर गणपती पराते (४०) रा. वाॅर्ड क्रमांक १, हनुमान घाट, खापा हा आपल्या घरून गांजाची विक्री करीत होता. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या पथकाने त्याच्या घरी धाड टाकून तपासणी केली असता गांजाचे बंडल आढळून आले. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पराते याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. कारवाई पथकात पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र गौरखेडे, सहायक फौजदार बाबा केचे, पोलीस हवालदार चंद्रशेखर गडेकर, नीलेश बर्वे, पोलीस नायक सत्यशील कोठारे, महिला पोलीस नायक नम्रता बघेल आदींचा समावेश होता.