गांजा विक्रेत्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:27 IST2020-12-12T04:27:07+5:302020-12-12T04:27:07+5:30
केळवद : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केळवद येथे केलेल्या कारवाईमध्ये गांजा विक्रेत्यास अटक करून त्याच्याकडून नऊ हजार रुपये किमतीचा ...

गांजा विक्रेत्यास अटक
केळवद : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केळवद येथे केलेल्या कारवाईमध्ये गांजा विक्रेत्यास अटक करून त्याच्याकडून नऊ हजार रुपये किमतीचा ८२२ ग्रॅम गांजा जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. १०) करण्यात आली.
रामराव शालिकराम दाते (७२, रा. वाॅर्ड क्रमांक-१, केळवद, ता. सावनेर) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना केळवद येथे गांजा विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी धाड टाकून रामरावच्या घराची झडती घेतली. घरात गांजा आढळून येताच त्याला अटक केेली. त्याच्याकडून ९००० रुपये किमतीचा ८२२ ग्रॅम गांजा जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे व उपनरीक्षक नरेंद्र गाैरखेडे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.