‘मेट्रोरिजन’साठी उमेदवारांची गर्दी
By Admin | Updated: April 23, 2015 02:30 IST2015-04-23T02:30:08+5:302015-04-23T02:30:08+5:30
महानगर नियोजन समितीच्या (मेट्रोरिजन) निवडणुकीसाठी बुधवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी केली.

‘मेट्रोरिजन’साठी उमेदवारांची गर्दी
नागपूर : महानगर नियोजन समितीच्या (मेट्रोरिजन) निवडणुकीसाठी बुधवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी केली. एकूण २८ जागांसाठी ६२ अर्ज आले असून २४ तारखेला याची छाननी होणार आहे.
महानगर नियोजन समितीच्या शहरातील २० तर ग्रामीण भागातील ८ अशा एकूण २८ जागांसाठी १७ मे रोजी निवडणूक होत आहे.. शहर विभागातील २० जागांसाठी एकूण ३२ अर्ज आले. यापैकी ११ अर्ज शेवटच्या दिवशी तर ग्रामीण भागातील ८ जागांसाठी एकूण ३० अर्ज आले; त्यापैकी २५ अर्ज शेवटच्या दिवशी सादर करण्यात आले. ग्रामीणमधून आलेल्या अर्जांमध्ये सावनेर १, हिंगणा ५, नागपूर ग्रामीण ७, पारशिवनी ४, कामठी ४ आणि मौदा येथून ९ उमेदवारांनी अर्ज भरले.
शहरी भागातील मतदारसंघासाठी काँग्रेसने संजय महाकाळकर, दीपक कापसे, अरुण डवरे, प्रशांत धवड, रेखा बारहाते आणि सुरेश जग्यासी यांना उमेदवारी दिली आहे. महापालिकेतील सत्ताधारी नागपूर विकास आघाडीतर्फे २१ उमेदवारांनी अर्ज भरले असून, त्यात नरेंद्र बोरकर, देवेंद्र मेहेर, चेतना टांक, बंडू राऊत, प्रवीण भिसीकर, सुषमा चौधरी, सतीश होले, स्वाती आखतकर, साधना बरडे, मीना तिडके, राजू लोखंडे, परिणय फुके, अस्लम खान, अश्विनी जिचकार, नीलिमा बावणे, जयश्री वाडीभस्मे, दिव्या धुरडे, जगदीश ग्वालबंशी, भाग्यश्री कानतोडे, विद्या कन्हेरे आणि मंगला डवरे यांचा समावेश आहे. बसपातर्फे अभिषेक शंभरकर, सत्यभामा लोखंडे आणि मुरली मेश्राम यांनी अर्ज भरले आहे. शिवसेनेतर्फे अल्का दलाल, राष्ट्रवादीतर्फे प्रगती पाटील यांनी अर्ज भरला.ग्रामीणमधून रवींद्र चिखले, प्रकाश डोमकी, प्रवीण खाडे, देवराव कडू, संदीप घोये, विजय निकोसे, मनीष कारेमोरे, अमोल खोडके, नीता पोटफोडे, कल्पना राऊत, घनश्याम ठाकरे, ममता अंबीलुडके, रामेश्वर साठवणे, पार्वता आत्राम, चंदा जुगडे, मोहन माकडे, चांगो तिजारे, गीता घाटे, कांता बावनकुळे, सुनील कोहळे, राजू आखरे, भूषण बोरकुटे, कैलास वैद्य, फकीरा कुळमेते, राजेंद्र दुधबळे, जितेंद्र चव्हाण, नंदू धानकुटे, सूर्यकांत ढोबळे, चेतनलाल पांडे, लहू दहिफळे यांचा समावेश आहे.(प्रतिनिधी)