शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

आरपीएफची परीक्षा रद्द झाल्याने उमेदवार संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 23:50 IST

रेल्वे सुरक्षा दलाने ७९८ शिपाई पदाच्या भरतीसाठी बुधवारी संगणक परीक्षा घेण्यात येणार होती. ‘श्री साई कॉम्प्युटर्स ऑनलाईन एक्झाम’ तेजस्विनी ज्युनिअर कॉलेज कोराडी येथे परीक्षेचे केंद्र होते. नागपूरसह विदर्भ आणि पुणे व मुंबई येथून परीक्षार्थी पोहचले होते. पण ऐनवेळी कुठलेही कारण न देता परीक्षा रद्द झाल्याचे उमेदवारांना सांगण्यात आले. त्यामुळे परीक्षा केंद्रावरच परीक्षार्थींनी संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देऐनवेळी रद्दची घोषणा : उमेदवारांची परीक्षा केंद्रावर नारेबाजी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने ७९८ शिपाई पदाच्या भरतीसाठी बुधवारी संगणक परीक्षा घेण्यात येणार होती. ‘श्री साई कॉम्प्युटर्स ऑनलाईन एक्झाम’ तेजस्विनी ज्युनिअर कॉलेज कोराडी येथे परीक्षेचे केंद्र होते. नागपूरसह विदर्भ आणि पुणे व मुंबई येथून परीक्षार्थी पोहचले होते. पण ऐनवेळी कुठलेही कारण न देता परीक्षा रद्द झाल्याचे उमेदवारांना सांगण्यात आले. त्यामुळे परीक्षा केंद्रावरच परीक्षार्थींनी संताप व्यक्त केला.आरपीएफने शिपाई या पदाकरिता (७९८) जानेवारी महिन्यात जाहिरात काढली होती. या पदाकरिता राज्यातील तरुणांनी अर्ज केले. परीक्षा अर्ज भरण्याकरिता चालानसाठी काही उमेदवारांनी ५०० तर काही जणांनी २०० रुपये शुल्क भरले. अर्जाच्या छाननीनंतर पात्र उमेदवारांना परीक्षेसाठी बोलाविण्यात आले. पहिल्या टप्प्यात संगणक परीक्षा, तर दुसऱ्या टप्प्यात शारीरिक चाचणी होणार होती. बुधवार २७ मार्च रोजी आयोजित संगणक परीक्षेकरिता कोराडी मार्गावरील तेजस्विनी ज्युनियर कॉलेज हे केंद्र देण्यात आले. परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांनी सांगितले की, ११.१५ वाजता पेपर होता. जवळपास २०० उमेदवार केंद्रावर पोहोचले, मात्र त्यांना आत घेतले नाही. तसेच तांत्रिक कारणामुळे परीक्षा रद्द झाल्याचे सांगितले. परीक्षा केंद्रावर पिण्याच्या पाण्याची काहीच व्यवस्था नव्हती. परीक्षेसाठी उमेदवार मुंबई, पुणे, भुसावळ आदी शहरातून आले होते. त्यामुळे संतप्त उमेदवारांनी परीक्षा केंद्रावरच नारेबाजी केली. परीक्षा रद्द झाल्याचे आधी कळविले असते तर वेळ आणि पैसा वाचला असता, अशी भावना सुबोध चहांदे या परीक्षार्थ्याने आणि इतर उमेदवारांनी व्यक्त केली.

टॅग्स :railwayरेल्वेagitationआंदोलन