शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

उपराजधानीत चार मिनिटाचा उशीर परीक्षार्थ्याला भोवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 10:43 AM

‘सीबीएसई’तर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेत नियमांचे पालन न करता परीक्षा केंद्रावर उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्याला फटका बसला आहे.

ठळक मुद्देकेंद्रावर परीक्षा देण्यास मनाई ‘सीबीएसई’च्या नियमांचे पालन केले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सीबीएसई’तर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेत नियमांचे पालन न करता परीक्षा केंद्रावर उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्याला फटका बसला आहे. परीक्षा केंद्रावर चार मिनिटांनी उशिरा पोहोचल्याने विद्यार्थ्याला पेपर देण्यासाठी आत सोडण्यात आले नाही. नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याने परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांकडून त्याला दिलासा देण्यात आला नाही व नाईलाजाने त्याला पेपर न देताच वापस जावे लागले.परीक्षा केंद्रावर कुठल्याही स्थितीत विद्यार्थ्यांनी दहा किंवा त्या अगोदर पोहोचावे असे निर्देश ‘सीबीएसई’ने अगोदरच दिले आहेत. सोमवारी भौतिकशास्त्राचा पेपर होता. शहरातील एका परीक्षा केंद्रावर सकाळी १० वाजून ४ मिनिटांनी विद्यार्थी पोहोचला. उशिरा आल्याचे कारण देत त्याला पेपरला बसू देण्यात आले नाही. त्याच्या पालकांनी केंद्र चालकांना विनंती केली. परंतु त्यांनी नियमांचा हवाला दिला. यासंबंधात ‘लोकमत’ने ‘सीबीएसई’चे परीक्षा नियंत्रक सौरभ भारद्वाज यांच्याशी संपर्क केला. निर्धारित वेळेपेक्षा उशिराने आल्यास परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येणार नाही, हे ‘सीबीएसई’ने परीक्षा प्रवेशपत्रांवर स्पष्ट केले आहे. संंबंधित विद्यार्थी पेपर सुरू झाल्यानंतर आला. त्यामुळे त्याला परीक्षा देता येणार नाही. जर त्याला परीक्षेला बसू दिले तर तो नियमांचा भंग ठरेल, असे सौरभ भारद्वाज यांनी स्पष्ट केले. संबंधित विद्यार्थ्याचे भविष्य खराब होऊ देणार नाही व त्याला ‘कम्पार्टमेन्ट’ परीक्षा देण्याची संधी देण्यात येईल, असेदेखील त्यांनी सांगितले.

टॅग्स :examपरीक्षा