शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांची कर्करोग तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:08 IST2021-02-08T04:08:21+5:302021-02-08T04:08:21+5:30
नागपूर : मुख्यमंत्री सचिवालय, हैद्राबाद हाऊस येथे जागतिक कर्करोग दिनानिमित्त मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी कक्षातर्फे विविध शासकीय विभागांतर्गत कार्यरत ...

शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांची कर्करोग तपासणी
नागपूर : मुख्यमंत्री सचिवालय, हैद्राबाद हाऊस येथे जागतिक कर्करोग दिनानिमित्त मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी कक्षातर्फे विविध शासकीय विभागांतर्गत कार्यरत महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांची कर्करोग पूर्व तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री साहाय्यता निधीचे सदस्य सचिव डॉ. के.आर. सोनपुरे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, पोलीस उपायुक्त डॉ. संदीप पखाले, श्रद्धानंद अनाथालयाच्या सचिव गीतांजली बुटी, आरुण्या फाऊंडेशनच्या डॉ. कुंतल सोनपुरे, जॉन अनभोरे, अभिषेक अग्ने, कुलदीप चौरसिया, राहुल राऊत व अमित राजूरकर उपस्थित होते. शिबिरात पोलीस विभागातील २६ महिला कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीत कुणाला कर्करोगाचे निदान झाले त्यांना पोलीस विभागाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.