कॅन्सर लक्षणांची माहिती गरजेची

By Admin | Updated: November 9, 2014 00:52 IST2014-11-09T00:52:06+5:302014-11-09T00:52:06+5:30

देशात कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. याला रोखण्यासाठी प्रत्येकाला कॅन्सरच्या लक्षणाची माहिती असणे आवश्यक आहे. यामुळे पहिल्याच स्टेजमध्ये कॅन्सरची माहिती होऊन रुग्ण बरा होऊ शकतो,

Cancer Information Information Needed | कॅन्सर लक्षणांची माहिती गरजेची

कॅन्सर लक्षणांची माहिती गरजेची

बी.के.शर्मा यांचे प्रतिपादन : कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जनजागृती कार्यक्रम
नागपूर : देशात कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. याला रोखण्यासाठी प्रत्येकाला कॅन्सरच्या लक्षणाची माहिती असणे आवश्यक आहे. यामुळे पहिल्याच स्टेजमध्ये कॅन्सरची माहिती होऊन रुग्ण बरा होऊ शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटलचे संयुक्त संचालक डॉ. बी.के. शर्मा यांनी येथे केले.
कॅन्सर जनजागृती आठवड्याच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ‘कॅन्सर जनजागृती कार्यक्रमा’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. मंचावर आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे, सचिव डॉ. कुश झुनझुनवाला, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंजली कोल्हे, डॉ.एस.बी.सप्रे, डॉ. सरिता कोठारी व डॉ. प्रशांत ढोके उपस्थित होते. डॉ. शर्मा म्हणाले, अनेक कॅन्सरच्या रुग्णांना लक्षणांची नीट माहिती राहत नाही. यामुळे ते तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्ये येतात. अशावेळी उपचार करणे कठीण जाते. याविषयी हॉस्पिटलकडून जनजागृती केली जाईल, असेही ते म्हणाले. डॉ. देशपांडे म्हणाले, कॅन्सर जनजागृती सप्ताह आयोजित करणे आज गरजेचे झाले आहे. यामुळे अनेक माहिती जनतेपर्यंत पोहोचते. यावेळी तोंडाचा व स्तनाचा कॅन्सर आणि त्यावरील उपचाराची माहिती डॉ. कोल्हे, डॉ. सप्रे, डॉ. कोठारी व डॉ. ढोके यांनी दिली. हा कार्यक्रम कॅन्सर रिलीफ सोसायटी, इंडियन मेडिकल असोसिएशन, हेडगेवार ब्लड बँक, संजीवनी, स्नेहांचल व आयुर्वेद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला डॉ. बोदाले, व्ही.पी.चौबे, एच.व्ही.घारे, मंजिरी जोशी, रश्मी राऊत, विष्णू भारनागत, स्नेहल सावतकर उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Cancer Information Information Needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.