शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

उपचार कार्य विस्तारण्याचा कॅन्सर रुग्णालयाचा प्रयत्न

By admin | Updated: August 3, 2016 02:44 IST

तंबाखूजन्य पदार्थांच्या विळख्यात असलेल्या भारतासारख्या देशात कर्करुग्णांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.

तालुका रुग्णालयांच्या डॉक्टर, नर्सेसना देणार प्रशिक्षण नागपूर : तंबाखूजन्य पदार्थांच्या विळख्यात असलेल्या भारतासारख्या देशात कर्करुग्णांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. या आजाराशी लढा देण्यासाठी आवश्यक साधनसामग्री मात्र उपलब्ध नाही. साधन सामाग्रीने परिपूर्ण होण्यासाठी आणखी बरीच वर्षे वाट पहावी लागणार आहे. अशावेळी असलेल्या साधनात उपचार कार्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटल व संशोधन केंद्रातर्फे केला जात आहे. यासाठी तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तराच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कॅन्सरबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. रुग्णालयाचे संचालक डॉ. पंकज चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅन्सर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना उपचाराच्या साधनांबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी आणखी २० ते २५ वर्षे लागण्याची शक्यता आहे. देशात कॅन्सरमुळे मृतांची संख्याही जगात सर्वात जास्त आहे. याचे कारण लोकांमध्ये असलेला जनजागृतीचा अभाव. विशेष म्हणजे प्राथमिक स्तरावर कॅन्सरचे डिटेक्शन झाल्यास हा आजार सहज बरा होऊ शकतो. मात्र कुठली लक्षणे आढळल्यास कॅन्सरचे निदान करावे याबाबत पुरेशी माहिती नसल्याने अनेक रुग्ण शेवटच्या स्तरावर मान्यताप्राप्त रुग्णालयात धाव घेतात. त्यामुळे साधन उपलब्ध नसले तरी सेवा मात्र ग्रामीण स्तरापर्यंत पोहचविली जाऊ शकते, असा विश्वास डॉ. चौधरी यांनी व्यक्त केला. याअंतर्गत राज्य शासनाच्या मदतीने येत्या ६ व ७ आॅगस्ट रोजी कॅन्सर रुग्णालयात प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. नवीन कॅन्सरच्या रुग्णांमध्ये मुख, स्तन, गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण ७० टक्के आहे. याअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुका रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस व लॅब टेक्निशियन यांना कॅन्सर तज्ज्ञांकडून प्राथमिक तपासणीचे तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. जेणेकरुन प्राथमिक लक्षणे आढळल्यास ग्रामीण स्तरावरील डॉक्टर संबंधित रुग्णाला थेट कॅन्सर रुग्णालयात पाठवू शकतील. येत्या ६ आॅगस्टला सायंकाळी ५ वाजता या कॅन्सर विज्ञान प्रशिक्षण कार्यशाळेचे उद््घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके आदी उपस्थित राहतील. पत्रपरिषदेला कॅन्सर रिलीफ सोसायटीचे सचिव अशोक क्रिपलानी, कोषाध्यक्ष अवतराम चावला, सहसचिव डॉ. आर.के. छांगाणी, महेश साधवानी, सुरेश केवलरमानी, सहसंचालक डॉ.बी.के. शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवीप्रसाद सेनगुप्ता, प्रशासकीय अधिकारी शाहिद अली आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी) कॅन्सर रुग्णालयात ६ ला प्रशिक्षण या कार्यक्रमांतर्गत ६ आॅगस्ट रोजी तालुका रुग्णालय व आरोग्य केंद्राच्या डॉक्टर व परिचारिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे तर ७ आॅगस्ट रोजी आयएमएच्या डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे डॉ. बी.के. शर्मा यांनी स्पष्ट केले. या कार्यशाळेत एम्सचे डॉ.जी.के. रथ, एशियन इन्स्टिट्यूट आॅफ आॅन्कोलॉजी मुंबईचे डॉ. पूर्वीश पारीख, डॉ. अमित भट, डॉ. सचिन हिंगमिरे, डॉ.ए. ए. रानडे आदी कॅन्सर तज्ज्ञ तांत्रिक प्रशिक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले.