शहरातील मालमत्ता करवाढ रद्द करा

By Admin | Updated: May 21, 2014 01:06 IST2014-05-21T01:06:56+5:302014-05-21T01:06:56+5:30

महापालिकेच्या स्थायी समितीने मालमत्ता करात ३० ते ७० टक्के वाढ करण्याचा घेतलेला निर्णय नागरिकांवर अन्यायकारक आहे. ही दरवाढ रद्द करा, अशी मागणी करीत आम आदमी पार्टीने

Cancel the property tax increase in the city | शहरातील मालमत्ता करवाढ रद्द करा

शहरातील मालमत्ता करवाढ रद्द करा

आम आदमी पार्टीची निदर्शने : लोकसभा निवडणुकीनंतर वाढ

नागपूर : महापालिकेच्या स्थायी समितीने मालमत्ता करात ३० ते ७० टक्के वाढ करण्याचा घेतलेला निर्णय नागरिकांवर अन्यायकारक आहे. ही दरवाढ रद्द करा, अशी मागणी करीत आम आदमी पार्टीने महापालिकेच्या सभागृहाबाहेर निदर्शने केली. आपचे संयोजक देवेंद्र वानखेडे, राजेश पुगलिया, डॉ. अशोक लांजेवार, एन.एल.सावरकर, नानाजी राजेधर यांच्यासह आपच्या कार्यकर्त्यांनी मालमत्ता करवाढीच्या विरोधात आवाज बुलंद केला. महापालिकेला करवाढ लादायची होती. मात्र लोकसभा निवडणूक होईपर्यंत ही करवाढ थांबवून ठेवण्यात आली. निवडणूक आटोपताच स्थायी समितीमध्ये करवाढीचा निर्णय घेण्यात आला. हा भाजपने नागपूरकर जनतेसोबत केलेला विश्वासघात आहे, असा आरोप या वेळी करण्यात आला. महागाईमुळे जनतेला जीवन जगणे कठीण झाले असताना आता महापालिकेने करवाढ लादून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडण्याचे काम केले आहे. ही करवाढ त्वरित थांबविण्यात यावी, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.

Web Title: Cancel the property tax increase in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.