मनपा प्रभाग पद्धती रद्द करा
By Admin | Updated: July 16, 2016 02:58 IST2016-07-16T02:58:40+5:302016-07-16T02:58:40+5:30
आगामी महापालिकेच्या निवडणुका प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय लोकशाहीसाठी घातक आहे,

मनपा प्रभाग पद्धती रद्द करा
संविधान चौकात धरणे : रिपाइंची मागणी
नागपूर : आगामी महापालिकेच्या निवडणुका प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय लोकशाहीसाठी घातक आहे, तेव्हा प्रभाग पद्धती रद्द करा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे (रिपाइं)करण्यात आली आहे. या मागणीसाठी शुक्रवारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर विभागीय आयुक्तांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात घनश्याम फुसे, निरंजन वासनिक, विनायक जामगडे, हरिदास टेंभुर्णे, प्रवीण कांबळे, अजय बोरकर, संजय पाटील, विवेक सहारे, लहानु बन्सोड, विश्वनाथ खांडेकर, डॉ. शिवशंकर बनकर, विश्वास पाटील, अरुण मेश्राम, भागवत डोंगरे, मोरेश्वर बोरकर, रवींद्र पाटील, नागेश बडगे, शैलेश गायकवाड, प्रशांत खोब्रागडे, उदाराम वानखेडे, रमेश घरडे, एकनाथ ताकसांडे, राजरतन कुंभारे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होते.(प्रतिनिधी)